महिला सैनिकांना मातृत्वाची रजा पदानुसार भेदभाव नाही : संरक्षण खात्याचा निर्णय

जगातील सर्वात उंच युद्धभूमी सियाचिनबरोबरच युद्धनौकेवर महिला अधिकारी तैनात आहेत.
महिला सैनिकांना मातृत्वाची रजा पदानुसार भेदभाव नाही : संरक्षण खात्याचा निर्णय

नवी दिल्ली : सैन्य दलातील महिला सैनिकांना मातृत्वाची रजा मिळताना पदानुसार भेदभाव होणार नाही. अधिकारी किंवा सैनिकांना समानपणे मातृत्वाची रजा मिळणार आहे. तसेच मुलांची देखभाल व कायदेशीररीत्या मूल दत्तक घेतल्यास रजा मिळणार आहे, असे संरक्षण खात्याने जाहीर केले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्य दलातील अधिकाऱ्यांबरोबरच सैनिकांना समान सुट्टीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यामुळे सैन्य दलातील सर्व महिलांना समानपणे सुट्टी लागू केली जाईल. अधिकारी असो किंवा अन्य, कोणत्याही कर्मचाऱ्यांना मातृत्वाची रजा मिळणार आहे. या निर्णयामुळे सैन्य दलातील सर्व महिलांप्रति समान दृष्टिकोन विकसित होण्यास मदत मिळेल. त्यांचे पद कोणतेही असो. सुट्टीच्या नवीन नियमामुळे महिलांना विशिष्ट कौटुंबिक, प्रासंगिक व सामाजिक जबाबदाऱ्या पाडता येऊ शकतात.

संरक्षण खात्याने सांगितले की, या सुविधेमुळे महिलांच्या कामात सुधारणा होईल. त्यांना काम व कौटुंबिक जीवनातील संतुलन राखता येईल. जगातील सर्वात उंच युद्धभूमी सियाचिनबरोबरच युद्धनौकेवर महिला अधिकारी तैनात आहेत. तसेच लढाऊ विमानाचे वैमानिक म्हणून त्या काम करत आहेत. सैन्य दलातील प्रत्येक क्षेत्रात महिला काम करत आहेत.

२०१९ मध्ये भारतीय लष्कराच्या पोलीस विभागात सैनिक म्हणून महिलांची भरती करण्यात आली. संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, महिलांना पुरुषांसोबत सर्वच क्षेत्रात कार्यरत राहिले पाहिजे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे म्हणणे आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in