उंदरांनी फस्त केले ड्रग्स? पोलिसांनी केला अजब दावा

उत्तर प्रदेशमधील मथुरा पोलिसांनी असा दावा केला की सर्वचजण चक्रावले. उंदरांनी ड्रग्स झाल्याचा दावा केल्याने खळबळ
उंदरांनी फस्त केले ड्रग्स? पोलिसांनी केला अजब दावा

उत्तर प्रदेशमधील मथुरा पोलिसांनी असा अजब दावा केला की सर्वजण चक्रावले. उंदरांनी शेरगड आणि हायवे पोलीस ठाण्यातील गोदामांमध्ये साठवलेला ५८१ किलो मारिजुआना ड्रग्जचा साठा फस्त केल्याचा दावा मथुरा पोलिसांनी विशेष नार्कोटिक्स ड्रग्ज न्यायालयात केला. न्यायालयाने यावर्षी एनडीपीसी कायद्याअंतर्गत जप्त केलेल्या मारिजुआना या ड्रग्जबाबत माहिती देण्यास सांगितले. त्यानंतर पोलिसांनी हा अहवाल न्यायालयाला दिला. मिळालेल्या माहितीनुसार, या ड्रग्सची किंमत तब्बल ६० लाख रुपये होती

पोलिसांनी हा दावा केल्यानंतर अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी मथुराचे एसएसपी अभिषेक यादव यांना पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, उंदरांच्या धोक्याबाबत उपाययोजना करण्याचे आदेशदेखील न्यायालयाने दिले आहेत. गोदामांमध्ये साठवण्यालेल्या ड्रग्जच्या विल्हेवाटीसंदर्भात न्यायालयाने पाच कलमी निर्देशही जारी केले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ही २६ नोव्हेंबरला होणार आहे. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हायवे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १९५ किलो ड्रग्ज उंदराने खालल्याची माहिती सरकारी वकिलाने न्यायालयात दिली होती, असे न्यायाधीशांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in