
प्रयागराज : मथुरेच्या शाही ईदगाह मशिदीला वादग्रस्त संरचना म्हणून घोषित करण्याची मागणी करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. २३ मे रोजी न्यायालयाने हिंदू पक्षाच्या या प्रकरणीच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता.
५ मार्च रोजी हिंदू पक्षकारांचे वकील महेंद्र प्रताप सिंह यांनी ही रचना वादग्रस्त घोषित करण्यासाठी याचिका दाखल केली होती.
याचिकेत म्हटले होते की, मशिदीकडे जमिनीची कागदपत्रे नाहीत. त्यांनी अतिक्रमण केले आहे. तिला मशीद का म्हणावी? म्हणून, मशिदीलाही वादग्रस्त संरचना घोषित करावे. याबाबत मुस्लिम पक्षाने आक्षेप नोंदवला होता. त्यात म्हटले होते की, हिंदू पक्षकारांची मागणी पूर्णपणे चुकीची आहे. न्या. राममनोहर नारायण मिश्रा यांच्या एकल खंडपीठासमोर या प्रकरणाची चार वेळा सुनावणी झाली आहे. या याचिकेव्यतिरिक्त, हिंदू पक्षाच्या इतर १८ याचिकांवरही उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.