"कदाचित आज फक्त एकच व्यक्ती मंदिरात जाऊ शकते", मंदिरात जाण्यापासून रोखल्याने राहुल गांधींनी साधला निशाणा

सध्या भारत जोडो न्याय यात्रा आसाम राज्यातील नगाव जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यात आसामाचे वैष्णव संत शंकरदेव यांचे जन्मस्थळदेखील आहे. आज राहुल गांधी हे बर्दोवा येथील मंदिरात जाणार होते. मात्र, त्यांना या मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
"कदाचित आज फक्त एकच व्यक्ती मंदिरात जाऊ शकते", मंदिरात जाण्यापासून रोखल्याने राहुल गांधींनी साधला निशाणा

आज संपूर्ण देश अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण आणि रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अनुभवत आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण देशभरातील मान्यवरांना आमंत्रण पाठवण्यात आले आहेत. काँग्रेसने मात्र या सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे हा सोहळा सुरु असताना काँग्रेस नेते राहुल गांधी हे 'भारत जोडो न्याय यात्रे'त व्यस्त आहेत. सध्या ही यात्रा आसाम राज्यातील नगाव जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यात आसामाचे वैष्णव संत शंकरदेव यांचे जन्मस्थळदेखील आहे. आज राहुल गांधी हे बर्दोवा येथील मंदिरात जाणार होते. मात्र, त्यांना या मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, कदाचित आज फक्त एकच व्यक्ती मंदिरात जाऊ शकतो, असे म्हणत त्यांनी नाव न घेतला पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.

आम्हाला तिथे आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, आता त्याठिकाणी जाऊ दिले जात नाही. का जाऊ दिले जात नाही, मी याचे कारण विचारत आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यावेळी मंदिर प्रवेशावरुन राहुल गांधी यांची स्थानिक पोलिसांसोबत बाचाबाचीही झाली. यामुळे भारत जोडो न्याय यात्रेत तणाव निर्माण झाला होता. मी इथे आलो आहे तर मला फक्त देवासमोर हात जोडायचे आहेत, असे म्हणत राहुल यांनी परवानगी मागितली होती. मात्र, त्यांना दुपारी 3 वाजेनंतर तुम्ही दर्शनाला जाऊ शकता, असे उत्तर दिल्याचा दावा काँग्रेसने केला.

मला मंदिरात जायचे आहे. त्यांना नाही वाटत की मी मंदिरात जावे. कदाचित मला मंदिरात जाऊ न देण्याचा आदेश वरुन आला आहे, असेही राहुल म्हणाले.

काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, अधिकाऱ्यांनी राहुल यांना सांगितले की त्यांच्याकडे तसे आदेश आहेत. त्यावर गांधी यांनी मी अशी कोणती चूक केलीये की तुम्ही मला मंदिरात जाण्यापासून रोखताय? असा सवाल केला. त्यांनी त्यांच्याजवळ असलेली परवानगी देखील दाखवली. मात्र, तरीदेखील त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखल्याचे काँग्रेसने म्हटले.

काँग्रेसने सुरु केले धरणे आंदोलन-

राहुल गांधी यांना मंदिरात जाण्यापासून रोखल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी तिथेच धरणे आंदोलन सुरु केले. यावेळी आम्हाला मंदिरात जाण्यापासून का अडवले जात आहे, असा सवालही करण्यात आला. आम्ही बळजबरीने मंदिरात शिरणार नाही. आमची ती प्रवृत्ती नाही, असे म्हणत मंदिराच्या प्रवेशद्वारापाशीच राहुल यांनी आंदोलन छेडले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in