संपर्क साधल्यास रशिया-युक्रेन संघर्षात मध्यस्थी; परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे विधान

संपर्क साधल्यास भारत रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्यास तयार आहे, असे विधान परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी केले.
संपर्क साधल्यास रशिया-युक्रेन संघर्षात मध्यस्थी; परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे विधान

नवी दिल्ली : संपर्क साधल्यास भारत रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्यास तयार आहे, असे विधान परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी केले. आम्ही जिथे जिथे मदत करू शकतो तिथे आम्हाला ते करण्यात आनंद होतो. जेव्हा आमच्याशी संपर्क साधला जातो तेव्हा आम्ही खुले असतो. तथापि, आम्ही स्वतः होऊन या दिशेने काही सुरुवात करावी यावर आमचा विश्वास नाही, असे ते म्हणाले.

जर्मन आर्थिक दैनिक हँडल्सब्लाटला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, युक्रेन संघर्षानंतर मध्य-पूर्वेतील भारताच्या ऊर्जा पुरवठादारांनी जास्त किंमत देणाऱ्या युरोपला पेट्रोलियम उत्पादनांचा पुरवठा करण्यास प्राधान्य दिले आणि भारताकडे रशियन तेल खरेदी करण्याशिवाय पर्याय नव्हता. जयशंकर म्हणाले की, भारताचे रशियाशी “स्थिर” आणि “अत्यंत मैत्रीपूर्ण” संबंध आहेत आणि रशियाने कधीही भारताच्या हितांना धक्का लावला नाही. दुसरीकडे आमचे चीनशी राजकीय आणि लष्करीदृष्ट्या अधिक तणावपूर्ण संबंध होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in