युक्रेनहून परतलेले वैद्यकीय विद्यार्थी वाऱ्यावर; प्रवेशासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

सरकारने न्यायालयाला सांगितले की, ‘नीट’ परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळतात ते आणि स्वस्त शिक्षणासाठी युक्रेनला गेले
युक्रेनहून परतलेले वैद्यकीय विद्यार्थी वाऱ्यावर; प्रवेशासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

युक्रेनमधून परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना भारतात प्रवेश देणे कायदेशीरदृष्ट्या शक्य नाही, असे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दिले आहे. युक्रेनवरून परतलेल्या विद्यार्थ्यांना भारतातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली होती.

सरकारने न्यायालयाला सांगितले की, ‘नीट’ परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळतात ते आणि स्वस्त शिक्षणासाठी युक्रेनला गेले. हे विद्यार्थी युक्रेनच्या महाविद्यालयातून परवानगी घेऊन दुसऱ्या देशात पदवी पूर्ण करण्याचा पर्याय निवडू शकतात. या मुलांना चांगले गुण नसताना देशातील चांगल्या महाविद्यालयात प्रवेश दिल्यास ‘नीट’मध्ये कमी गुण मिळाल्याने प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय केल्यासारखे होईल.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in