पारलेने 'मेलोडी'चे उत्पादन वाढविले...पंतप्रधान मोदींनी मेलोनी यांना दिलेल्या 'चाॅकलेट भेटी'नंतर मागणीत वाढ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या राष्ट्राध्यक्षा जॉर्जिया मेलोनी यांना 'मेलोडी' चॉकलेटचा (टॉफी) पॅक भेट दिल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या टॉफीच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे.
पारलेने 'मेलोडी'चे उत्पादन वाढविले...पंतप्रधान मोदींनी मेलोनी यांना दिलेल्या 'चाॅकलेट भेटी'नंतर मागणीत वाढ
पारलेने 'मेलोडी'चे उत्पादन वाढविले...पंतप्रधान मोदींनी मेलोनी यांना दिलेल्या 'चाॅकलेट भेटी'नंतर मागणीत वाढ
Published on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या राष्ट्राध्यक्षा जॉर्जिया मेलोनी यांना 'मेलोडी' चॉकलेटचा (टॉफी) पॅक भेट दिल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या टॉफीच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. या वाढत्या मागणीमुळे कंपनीने मेलोडीचे उत्पादन वाढवले आहे, अशी माहिती पारले प्रॉडक्ट्सचे उपाध्यक्ष मयंक शाह यांनी गुरुवारी दिली.

हा क्षण ब्रँडच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी मोहीम असल्याचे सांगत शाह यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, पंतप्रधान मोदींनी या स्वदेशी ब्रँडला दिलेल्या पाठबळाला कंपनी आता पूर्ण साथ देईल. पार्ले प्रॉडक्ट्स आता मेलोडीची जागतिक उपस्थिती आणखी वाढवण्यासाठी प्रयत्न करेल. ती सध्या १०० देशांमध्ये उपलब्ध आहे.

ग्राहक आणि वितरकांकडून मिळालेल्या प्रतिक्रियांबाबत विचारले असता ते म्हणाले, वितरकांकडून आम्हाला मिळालेला सुरुवातीचा फीडबॅक असा आहे की, होय, बाजारात प्रचंड मागणी आहे. अचानक आम्हाला मेलोडीच्या मागणीत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. कंपनीने मेलोडीचे उत्पादन वाढवले आहे का, असे विचारले असता ते म्हणाले, कालपासूनच आम्ही उत्पादन वाढवले आहे. आम्हाला देशातूनच नव्हे तर परदेशातूनही मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे. पंतप्रधान मोदींनी मेलोनी यांना अनपेक्षितपणे 'मेलोडी'चा पॅक भेट दिल्याबद्दल प्रतिक्रिया देताना शाह म्हणाले, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक नेत्यांना पार्ले मेलोडी भेट देत आहेत तेव्हा पारले परिवारातील आपल्या सर्वांसाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. मोदींचे हे पाऊल जागतिक पातळीवर स्वदेशी ब्रँड्सच्या संभाव्यतेची एक शक्तिशाली साक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

पारलेने 'मेलोडी'चे उत्पादन वाढविले...पंतप्रधान मोदींनी मेलोनी यांना दिलेल्या 'चाॅकलेट भेटी'नंतर मागणीत वाढ
कुणाच्या तोंडी, कुणाचे गोडवे... 'मेलोडी'ची क्रेझ अन् पारलेला भाव...गुंतवणूकदारांनी केली खरेदी चूक, शेअरला बाजारात लागले अप्पर सर्किट

'पार्ले इंडस्ट्रीज'च्या शेअरला सलग अप्पर सर्किट

दलाल स्ट्रीटवर 'पार्ले इंडस्ट्रीज लिमिटेड'च्या शेअर्समधील उत्साह थांबण्याचे नाव घेत नाहीय. खरेदीचा उत्साह कमी न होऊ देता गुंतवणूकदारांनी गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी या शेअरमध्ये जोरदार खरेदी केली. वाढीसह कंपनीचे बाजारमूल्य २६.९१ कोटी रुपये झाले आहे.

क्विक कॉमर्स (त्वरित डिलिव्हरी देणारे ॲप्स) सारख्या चॅनेल्सवर आम्हाला तत्काळ वाढ दिसून येत आहे. कारण तिथे खरेदीचे प्रमाण वाढले आहे. आम्हाला ई-कॉमर्सवरूनही मोठी मागणी येत असल्याचे दिसते आहे. मेलोडीच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. क्विक कॉमर्सवर 'मेलोडी' या शब्दाचा सर्च रिझल्ट खूप वाढला आहे. काल सकाळपासूनच आम्हाला हा बदल पाहायला मिळत आहे.

मयांक शाह, उपाध्यक्ष, पारले प्रॉडक्ट्स

logo
marathi.freepressjournal.in