Memu train accident : गुजरातमध्ये रेल्वेच्या इंजिनला आग ; सुदैवाने जीवितहानी नाही

दाहोद येथे सकाळी ११:४५ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्यामुळे प्रवाशांना तात्काळ गाडीतून खाली उतरवण्यात आलं
Memu train accident : गुजरातमध्ये रेल्वेच्या इंजिनला आग ; सुदैवाने जीवितहानी नाही

गुजरातच्या दाहोद-आनंद या मेमू रेल्वेच्या इंजिनाला आग लागल्याची घटना घडली आहे. यानंतर एकच खळबळ उडाली. दाहोद येथे सकाळी ११:४५ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्यामुळे प्रवाशांना तात्काळ गाडीतून खाली उतरवण्यात आलं. संबंधित विभागाला बोलावून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मेमू ट्रेन नंबर ०९३५० दाहोद-आनंद मेमू स्पेशन ट्रेनचे जैकोट येथे आगमन झाल्यानंतर १२ वाजेच्या सुमारास इंजिन कंपारमेन्टच्या खालून जाळ व धूर येत असल्याचं दिसून आलं. या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही. दरम्यान, दुपारी १.१४ वाजता ही ट्रेन जाकोट स्थानकातून पुढे प्रस्थान करण्यात आली. या घटनेचा तपासाचे आदेश देण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in