मासिक पाळीची रजा देण्याचा प्रस्ताव नाही

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी विचारलेल्या प्रश्नावर इराणी बोलत होत्या.
मासिक पाळीची रजा देण्याचा प्रस्ताव नाही

नवी दिल्ली : सर्व कंपन्यांमध्ये महिलांना मासिक पाळीची भरपगारी रजा देण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही, असे केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितले.

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी विचारलेल्या प्रश्नावर इराणी बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, मासिक पाळी ही प्रत्येक महिलेची शारीरिक बाब आहे. केवळ काही महिला किंवा मुलींना त्याचा त्रास होत असतो. औषधोपचाराने अनेक जणांवर उपचार करता येऊ शकतो. नोकरदार महिलांना विविध पद्धतीच्या रजा दिल्या जात आहेत.

logo
marathi.freepressjournal.in