पंतप्रधान मोदींकडून नाताळच्या शुभेच्छा ;ख्रिस्ती बांधवांच्या योगदानाचा गौरव

मोदी यांनी नाताळनिमित्त नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ख्रिस्ती बांधवांशी संवाद साधला.
पंतप्रधान मोदींकडून नाताळच्या शुभेच्छा
;ख्रिस्ती बांधवांच्या योगदानाचा गौरव
Published on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नाताळनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. तसेच ख्रिस्ती बांधवांनी स्वातंत्र्यलढ्यात आणि देशाच्या उभारणीत दिलेल्या योगदानाचा गौरव केला. येशू ख्रिस्ताने सेवा आणि करुणा या मूल्यांसाठी जीवन वेचले. त्यांनी समाजाला सर्वसमावेशक बनवण्याचा प्रयत्न केला. ही मूल्ये आपल्यासाठीही सतत मार्गदर्शक असल्याचे मोदी यांनी सांगितले.

मोदी यांनी नाताळनिमित्त नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ख्रिस्ती बांधवांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्वांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. तसेच आपला ख्रिस्ती समुदायाशी जुना ऋणानुबंध असल्याचे सांगितले. मी गुजरातमधील मणिनगर मतदारसंघातून निवडणूक ळढवत होतो. तेथे मोठ्या प्रमाणावर ख्रिस्ती बांधवाचे वास्तव्य होते. मी अनेक वेळा त्यांच्याशी संवाद साधत होतो. माझे त्यांच्याबरोबर घनिष्ट संबंध होते, अशा शब्दांत मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातही ख्रिस्ती समुदायाचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. सेंट स्टीफन्स कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य सुशील कुमार रुद्र यांच्याकडून महात्मा गांधी यांना असहकार चळवळीची कल्पना सुचली होती, असेही मोदी यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in