Facebook Meta lays off : ट्विटरनंतर फेसबुकनेही घेतला मोठा निर्णय!

एलॉन मस्क हे ट्विटरचे मालक झाल्यानंतर कर्मचारी कपातीचा मोठा निर्णय घेता सर्वांनाच धक्का दिला. त्यानंतर आता फेसबुकनेही मोठा निर्णय घेण्याचे ठरवले आहे. (Facebook Meta lays off)
Facebook Meta lays off : ट्विटरनंतर फेसबुकनेही घेतला मोठा निर्णय!
Published on

गेले अनेक दिवस एलॉन मस्क यांनी घेतलेल्या ट्विटर कंपनीतील कर्मचारी कपातीचा निर्णय चर्चेत आहे. (Facebook Meta lays off) असे असताना आता फेसबुकमधूनही मोठी बातमी समोर आली आहे. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ या प्रसिद्ध वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकची पॅरंट कंपनी असलेल्या 'मेटा'ने पुढील आठवड्यामध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची तयारी सुरु केली आहे. असे झाल्यास सोशल मीडियाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कर्मचारी कपात ठरणार आहे. यासंदर्भात अद्याप 'मेटा'कडून कोणतीही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.

सप्टेंबरच्या अखेरीस मेटाने जगभरात ८७,००० हून अधिक कर्मचाऱ्यांची नोंद केली आहे. मेटाच्या शेअरमध्ये चालू वर्षांमध्ये ७३ टक्के घसरण झाली आहे. २०१६मधील तुटीच्याही खाली येत ५०० इंडेक्स असलेल्या साधारण कंपन्यांच्या शेअर्समध्ये मेटाच्या शेअर्सचा समावेश झाला आहे. मेटा शेअरच्या मूल्यामध्ये या वर्षात ६७ अरब डॉलरची घसरण झाली आहे. याचाच फटका कर्मचाऱ्यांना बसणार असल्याचे सांगितले जाते आहे.

logo
marathi.freepressjournal.in