आधी बलात्काराचा गुन्हा, आता माजी आमदाराचे दोन MMS व्हायरल; राजस्थानच्या राजकारणात खळबळ

महिलेच्या तक्रारीवरून मेवाराम जैन आणि आरपीएस आनंद सिंह राजपुरोहित यांच्यासह 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी महिलेने दोन अश्लील व्हिडिओ बाबत देखील माहिती दिली होती. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.
आधी बलात्काराचा गुन्हा, आता माजी आमदाराचे दोन MMS व्हायरल; राजस्थानच्या राजकारणात खळबळ

राजस्थान काँग्रेसचे माजी आमदार मेवाराम जैन यांचे दोन अश्लील एमएमएस व्हयारल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मेवाराम यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वी एका महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर समोर आलेले व्हिडिओ त्याच प्रकरणाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.

काही दिवसांपूर्वी एका विवाहित महिलेने बाडमेरचे काँग्रेसचे माजी आमदार मेवाराम जैन यांच्याविरोधात जोधपूरच्या राजीव गांधी नगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. जैन आणि त्यांचा सहकारी रामस्वरूप आचार्य यांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आणि तिच्या 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबतही अश्लील कृत्य केल्याचा आरोप केला आहे. महिलेच्या तक्रारीवरून मेवाराम जैन आणि आरपीएस आनंद सिंह राजपुरोहित यांच्यासह 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी महिलेने दोन अश्लील व्हिडिओ बाबत देखील माहिती दिली होती. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

"हा माणूस काँग्रेसचा जेफ्री एपस्टाईन, भाजपकडून हल्लाबोल -

भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर व्हिडिओ शेअर करत मेवाराम यांच्यावर हल्लाबोल केला आहे. एकामागून एक पोस्ट करत त्यांनी काँग्रेसलाही लक्ष्य केले आहे. मेवाराम यांनी छळ केलेल्या पीडितेची प्रियंका गांधी भेट घेणार का? असा सवाल त्यांनी विचारला. तसेच, त्यांनी काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणावर आवाज उठवणार का? असा सवालही केला. "हा माणूस (मेवाराम) काँग्रेसचा जेफ्री एपस्टाईन (अमेरिकन सेक्स ऑफेंडर) आहे. काँग्रेस हा स्लीझ बॅग (प्रामाणिकपणा किंवा नैतिकता नसलेला) आणि लैंगिक शोषण करणाऱ्यांचा पक्ष आहे. भंवरी देवीपासून मेवारामपर्यंत. त्यांच्या युवक काँग्रेसच्या अध्यक्षापासून ते तंदूर कांडपर्यंत. शांती धारीवालपासून ते नितीश कुमारांच्या त्या विधानांपर्यंत ज्याचा काँग्रेसने बचाव केला होता", अशी खरमरीत पोस्ट पूनावाला यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in