गरजेपेक्षा दिखाऊपणा वाढल्याने आर्थिक संकट वाढले; कर्जाचे ईएमआय भरताना मध्यमवर्गीयांच्या नाकीनऊ

भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी मध्यमवर्गीय महत्त्वाचे आहेत. सर्वात जास्त उपभोगासाठी खर्च हाच वर्ग करत असतो. या वर्गाला आकर्षित करायला अनेक मार्केटिंग धोरणे बनवली जातात. आता हाच मध्यमवर्गीय कर्जाच्या ‘ईएमआय’ खाली दबलेला आहे. याचे कारण महागाई किंवा कर्ज नाही तर...
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र'एआय'ने बनविलेली प्रतिमा
Published on

नवी दिल्ली : भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी मध्यमवर्गीय महत्त्वाचे आहेत. सर्वात जास्त उपभोगासाठी खर्च हाच वर्ग करत असतो. या वर्गाला आकर्षित करायला अनेक मार्केटिंग धोरणे बनवली जातात. आता हाच मध्यमवर्गीय कर्जाच्या ‘ईएमआय’ खाली दबलेला आहे. याचे कारण महागाई किंवा कर्ज नाही तर प्रत्येक वस्तूसाठी घेतले जाणारी छोटी छोटी कर्ज आहेत. प्रत्येक वस्तुसाठी जाणारा ‘ईएमआय’मुळे मध्यमवर्गीय हैराण झाला आहे.

एका अर्थतज्ज्ञाने सांगितले की, आज कमवा, उधार घ्या व त्यानंतर ते पैसे भरत राहा. कोणतीही बचत नाही व त्याचा फायदाही नाही. दरमहा जाणारा ‘ईएमआय’ सातत्याने लोकांचे उत्पन्न संपवत आहे आणि आणीबाणीच्या काळात लोकांकडे बचत नसते. विमानाचे तिकीट ते किराणा मालापर्यंत प्रत्येक बाब आता ‘ईएमआय’वर उपलब्ध आहे. त्यामुळे नोकरदार वर्गाला वेतन आपल्या बँक खात्यात कधी येते याची वाट पाहावी लागते. पण, वेतन जमा झाल्यानंतर काही वेळातच ते संपते. आता बहुतेक लोकांच्या बाबतीत ते घडत आहे. लोक खर्च वाढवत असून बचत कमी होत आहे. एक कर्ज यंत्रणा बनली असून लोक त्यात अडकत चालले आहेत.

एका कर्जदाराने सांगितले की, माझ्या खात्यात वेतनाचे ४३ हजार रुपये आले. ५ मिनिटांत सर्व खर्च जाऊन ७ रुपये राहिले. घराचे भाडे, ईएमआय, क्रेडिट कार्ड पेमेंट, विविध प्रकारची बिले आदींमध्ये वेतनाचा सर्व पैसा निघून गेला. ४३ हजार वेतनापैकी १९ हजार रुपये घरभाडे गेले. १५ हजार रुपये क्रेडिट कार्डची किमान रक्कम, अन्य काही रक्कम ईएमआय भरायला गेली. इंटरनेट, मोबाईलची बिल भरल्यानंतर शेवटी ७ रुपये राहिले.

काही मध्यमवर्गीय कुटुंब आपल्या किमान गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घेत आहेत, तर ५ ते १० टक्के मध्यमवर्गीय कुटुंब कर्जाच्या जाळ्यात अडकले आहेत. सध्या कर्ज घेणे अत्यंत सोपे झाले आहे. विशेष करून डिजिटल कर्ज घेणे. सध्या अनेक जणांचे वेतन वाढत नाही पण, लोक दुसऱ्याला दाखवण्यासाठी जास्त खर्च करत आहेत.

ईएमआयवर खर्च वाढला

अर्थतज्ज्ञांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार गेल्या तीन वर्षांत वैयक्तिक कर्ज घेण्याचे प्रमाण ७५ टक्के वाढले आहे. आपल्या वेतनाचा एक तृतीयांश हिस्सा लोक ‘ईएमआय’वर खर्च करत आहेत. त्यात घरभाडे, खाण्याचा खर्च व बचत यांचा समावेश नाही. काही लोकांचा हाच आकडा ४५ टक्क्यांपर्यंत जातो.

logo
marathi.freepressjournal.in