काश्मीरमध्ये पंडितांवर हल्ला:शोपियांत सफरचंदाच्या बागेत काम करणाऱ्या 2 पंडितांवर अतिरेक्यांचा गोळीबार

काश्मिरी पंडित, स्थलांतरीत मजबूर व सरकारी पोलिसांत काम करणाऱ्या तथा भारताप्रती सकारात्मक भूमिका असणाऱ्या स्थानिक मुस्लिमांना लक्ष्य
काश्मीरमध्ये पंडितांवर हल्ला:शोपियांत सफरचंदाच्या बागेत काम करणाऱ्या 2 पंडितांवर अतिरेक्यांचा गोळीबार

दक्षिण काश्मीरच्या शोपियांच्या छोटेपोरा भागात अतिरेक्यांनी सफरचंदाच्या बागेत काम करणाऱ्या भावांवर गोळीबार केला. त्यात एक जण ठार असून, दुसरा जखमी झाला आहे. दोन्ही अल्पसंख्यक समुदायाचे आहेत. सुनील कुमार असे मृताचे नाव आहे. जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरक्षा दलांनी या भागाची घेराबंदी केली आहे.

यापू्र्वी शुक्रवारी जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्याच्या सदुनारा गावात अतिरेक्यांनी एका मजुराची गोळी घालून हत्या केली होती. मोहम्मद अमरेज नामक हा 19 वर्षीय मजूर बिहारच्या मधेपुरा जिल्ह्याचा रहिवाशी होता.

खोऱ्यात का होत आहेत टार्गेट किलिंग्स

गुप्तहेर यंत्रणांच्या माहितीनुसार, टार्गेटेड किलिंग ही पाकिस्तानची काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्याची नवी योजना आहे. याचा हेतू कलम 370 रद्द बदल केल्यानंतर काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांवर पाणी फेरण्याचा आहे. कलम 370 रद्द झाल्यानंतर काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यात प्रामुख्याने अतिरेक्यांनी काश्मिरी पंडित, स्थलांतरीत मजबूर व सरकारी पोलिसांत काम करणाऱ्या तथा भारताप्रती सकारात्मक भूमिका असणाऱ्या स्थानिक मुस्लिमांना लक्ष्य केले जात आहे.

दरम्यान, गत मे-जून महिन्यात टार्गेट किलिंगच्या 9 घटना घडल्या. सरकारी आकडेवारीनुसार, यंदा अशा एकूण 16 घटना घडल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in