भारत हा जगातील सर्वाधिक दूध उत्पादक देश आहे. ८ कोटी शेतकरी दरवर्षी २०० दशलक्ष टन दुधाचे उत्पादन घेतात. मात्र वातावरण बदलामुळे दुधाचे उत्पादन कमालीचे घटणार असून ग्राहकांना ते चढ्या भावाने विकत घ्यावे लागेल, असा इशारा न्यूयॉर्क टाईम्स या दैनिकाने दिला आहे.
भारतात सध्या दुधाची गंगा वाहते आहे. दूध उत्पादनात जगात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र वातावरण बदलामुळे भविष्यात हे प्रचंड दूध उत्पादन घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे सामान्य ग्राहकांना ते महागड्या दराने विकत घ्यावे लागेल. जगासह भारतात उष्णता वाढत आहे. त्यामुळे दुभत्या जनावरांना त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे दूध उत्पादनात ११ टक्के घट होण्याची शक्यता आहे. बेभरवशाचा पडणारा पाऊस व वातावरणात होणारे टोकाचे बदल यामुळे जनावरांना पुरेसा चारा मिळत नाही, असे न्यूयॉर्क टाईम्सने आपल्या अहवालात म्हटले आहे.
म्हैशीची नवीन जात विकसीत
भारतातील बहुतांश दूध उत्पादन हे छोटे शेतकरी करतात. सध्या उष्णता वाढल्याने गावांमध्ये पाण्याची कमतरता जाणवते. तसेच प्रदूषणाचीही मोठी समस्या आहे. राष्ट्रीय दुग्ध संशोधन केंद्राने ही समस्या सोडवण्यासाठी अभ्यास केला आहे. इथे म्हैशीची नवीन जात विकसित केली आहे. ही जात अन्य प्राण्यांपेक्षा अधिक उष्णता सहन करू शकते. तसेच काही शास्त्रज्ञांनी जनावरांना बासरीचे संगीत ऐकवून त्यांचा तणाव शांत करण्याचा प्रयत्न केला. दूध देणारी जनावरे तणावमुक्त असणे गरजेचे आहे, असे डॉ. आशुतोष यांनी सांगितल