5G सेवा वेगाने सुरु करण्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे दूरसंचार कंपन्यांना आवाहन

वैष्णव यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिले आहे की, स्पेक्ट्रम वाटपाची पत्रे जारी करण्यात आली आहेत
 5G सेवा वेगाने सुरु करण्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे दूरसंचार कंपन्यांना आवाहन
Published on

दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी सांगितले की, दूरसंचार सेवा प्रदात्यांनी त्यांच्या 5G सेवा सुरू करण्याचा वेग वाढवावा. दूरसंचार सेवा कंपन्यांना स्पेक्ट्रम वाटपाचे पत्र दिल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी ही माहिती दिली. यावेळी दूरसंचार विभागाने स्पेक्ट्रम वाटप पत्र दूरसंचार कंपन्यांना त्याच दिवशी जारी केले आहे ज्या दिवशी यशस्वी बोलीदारांनी आगाऊ पैसे भरले आहेत.

वैष्णव यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिले आहे की, स्पेक्ट्रम वाटपाची पत्रे जारी करण्यात आली आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी दूरसंचार सेवा प्रदात्यांना 5G सेवा सुरू करण्याची तयारी जलद करण्याची विनंती केली आहे.

दूरसंचार सेवा प्रदात्या भारती एअरटेल, रिलायन्स जिओ, अदानी डेटा नेटवर्क्स आणि व्होडाफोन आयडिया यांनी नुकत्याच झालेल्या 5G स्पेक्ट्रम लिलावात अधिग्रहित केलेल्या स्पेक्ट्रमसाठी दूरसंचार मंत्रालयाकडे सुमारे १७,८७६ कोटी रुपये जमा केले आहेत. एअरटेलने ८,३१३.४ कोटी रुपये भरले आहेत, जे चार वार्षिक हप्त्यांच्या समतुल्य आहेत, तर इतर दूरसंचार कंपन्यांनी २० वार्षिक हप्त्यांमध्ये पैसे भरण्याचे पर्याय निवडले आहे.

तत्पूर्वी, एअरटेलचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनी गुरुवारी सांगितले की, दूरसंचार विभाग (डीओटी)ने आगाऊ पेमेंटच्या त्याच दिवशी स्पेक्ट्रम वाटप पत्र जारी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मित्तल म्हणाले की, दूरसंचार विभागातील माझ्या ३० वर्षांच्या अनुभवात ही पहिलीच वेळ आहे. व्यवसाय असाच असायला हवा.

logo
marathi.freepressjournal.in