ज्याला देव मानलं त्यानंच केला घात... नराधम शिक्षकानं अल्पवयीन विद्यार्थिनीवर केला बलात्कार

शिकवण्याच्या बहाण्यानं एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला घरी बोलवून तिच्यावर शिक्षकानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशातील आग्र्यात घडली आहे.
आग्रा बलात्कार
आग्रा बलात्कार प्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूने वापरली जाते

लखनऊ: शिकवण्याच्या बहाण्यानं एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला घरी बोलवून तिच्यावर शिक्षकानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशातील आग्र्यात घडली आहे. पीडितेच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नराधम शिक्षकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. आरोपी शिक्षक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

उत्तरप्रदेशातील आग्रा येथे एका नराधम शिक्षकानं शिकवण्याच्या बहाण्यानं त्याच्याच शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला आपल्या घरी बोलावलं. मंगळवारी विद्यार्थिनी त्याच्या घरी गेली असता नराधम शिक्षकानं तिच्यावर बलात्कार केला. नराधम शिक्षक एवढ्यावरच थांबला नाही तर, घडलेला प्रकार उघड केल्यास गंभीर परिणाम भोगायला लागतील, अशी धमकी त्यानं दिली.

जैतपुर पोलिस स्टेशनचं प्रभारी तरूण धीमान यांनी सांगितलं की, मंगळवारी आरोपी शिक्षकानं त्याच्याच शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिकवण्याच्या बहाण्यानं घरी बोलवलं आणि तिच्यावर बलात्कार केला. सदर प्रकरणाची कुठेही वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशीही धमकीही त्यानं दिली.

पीडिता घरी पोहोचली आणि तिनं आपल्या कुटूंबियांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडितेला घेऊन कुटुंबीय थेट पोलीस स्टेशनला पोहोचले. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३७६ (बलात्कार) आणि पॉक्सो एक्टनुसार केस नोंदवून घेतली आहे. आरोपी शिक्षकाचा शोध सुरु आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in