मनरेगा निधीचा गैरव्यवहार; पश्चिम बंगालमध्ये ईडीचे छापे

घोटाळ्यामध्ये त्यांचा सहभाग असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर शोध घेण्यात येत आहे, असा दावा त्यांनी केला
मनरेगा निधीचा गैरव्यवहार; पश्चिम बंगालमध्ये ईडीचे छापे
Published on

कोलकाता : मनरेगा निधीच्या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीच्या संदर्भात ईडीने मंगळवारी सकाळी पश्चिम बंगालमधील काही राज्य सरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांसह अनेक ठिकाणी छापेमारी केली. ईडीने सॉल्ट लेकच्या आयए ब्लॉकमधील पश्चिम बंगाल सिव्हिल सर्व्हिसेस (डब्लूबीसीएस) अधिकाऱ्याच्या निवासस्थानाची झडती घेतली. ते आधी हुगळी जिल्ह्यातील धनियाखली येथे ब्लॉक विकास अधिकारी म्हणून तैनात होते. झारग्राम जिल्ह्यातील एका डब्ल्यूबीसीएस अधिकाऱ्याच्या सरकारी निवासस्थानाचीही झडती सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हुगळी जिल्ह्यातील चिनसुरा येथील एका व्यावसायिकाच्या घराची आणि कार्यालयाचीही ईडीने झडती घेतली. तसेच मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बहरामपूर येथील राज्य सरकारी कर्मचाऱ्याशी संबंधित असलेल्या मालमत्तेवरही झडती घेण्यात आली. त्यांची पंचायत विभागात नियुक्ती करण्यात आली होती, असेही त्यांनी सांगितले. त्याच्या बहिणीच्या खात्यात साडेचार कोटी रुपये सापडले आहेत. ही रक्कम मनरेगा निधीतून असल्याचा संशय आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.घोटाळ्यामध्ये त्यांचा सहभाग असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर शोध घेण्यात येत आहे, असा दावा त्यांनी केला. कथित अनियमितता राज्यातील मनरेगा अंतर्गत जारी केलेल्या सुमारे २५ लाख बनावट जॉब कार्डशी संबंधित असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे

logo
marathi.freepressjournal.in