सात वर्षांनी सापडले बेपत्ता विमानाचे अवशेष; बंगालच्या उपसागरात झाले होते बेपत्ता

या विमानाचा शोध घ्यायला मोठी शोधमोहीम राबवली होती. मात्र, त्यावेळी कोणताही थांगपत्ता लागलेला नाही.
सात वर्षांनी सापडले बेपत्ता विमानाचे अवशेष; बंगालच्या उपसागरात झाले होते बेपत्ता

चेन्नई : भारतीय हवाई दलाचे विमान एन-३२ हे साडे सात वर्षांपूर्वी बंगालच्या उपसागरात कोसळले होते. या अपघातात २९ सैनिक बेपत्ता झाले होते. मोठी शोधमोहीम राबवूनही त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता. आता या विमानाचे अवशेष बंगालच्या उपसागरात ३.४ किमी खोलीवर सापडले आहेत.

संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेने पाठवलेल्या जलयानाने याबाबतची छायाचित्रे घेतली आहेत. चेन्नईच्या किनारपट्टीपासून ३१० किमीवर ‘एएन-३२’ विमानाचा अवशेष सापडले आहेत. या क्षेत्रात कोणतेही विमान बेपत्ता झाल्याचा इतिहास नाही. त्यामुळे या भागात सापडलेले अवशेष हे दुर्घटनाग्रस्त ‘एएन-३२’ विमानाचेच असावेत, असा कयास आहे.

हवाई दलाचे नोंदणी क्रमांक ‘के-२७४३’ हे ‘एएन-३२’ हे विमान २२ जुलै २०१६ मध्ये बंगालच्या उपसागरात बेपत्ता झाले होते. त्यात २९ सैनिक होते. या विमानाचा शोध घ्यायला मोठी शोधमोहीम राबवली होती. मात्र, त्यावेळी कोणताही थांगपत्ता लागलेला नाही.

कसा लागला शोध

राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेने बेपत्ता विमानाचा शोध घ्यायला जलयान पाठवले होते. या जलयानात मल्टी-बीम सोनार , सिंथेटिक एपर्चर सोनार व उच्च-रिझॉल्यूशन फोटोग्राफी आदी उपकरणे बसवली होती. या यानाने टिपलेल्या छायाचित्रातून समुद्राच्या तळाला दुर्घटनाग्रस्त विमानाचे अवशेष असल्याचे आढळले होते

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in