पृथ्वीचा विनाश करणाऱ्या लघुग्रहांवर मिशन डार्ट

पृथ्वीवर कोणत्याही प्रकारचे लघुग्रह आदळण्याची शक्यता निर्माण झाली तर हे तंत्रज्ञान पृथ्वीला वाचवू शकते.
पृथ्वीचा विनाश करणाऱ्या लघुग्रहांवर मिशन डार्ट

पृथ्वीचा विनाश टाळण्यासाठी ‘नासा’ने ‘डार्ट मिशन’ यशस्वीरीत्या राबवले आहे. या ‘डार्ट मिशन’अंतर्गत ‘नासा’चे डबल ॲस्ट्राॅयड रीडायरेक्शन स्पेसक्राफ्ट उल्केवर आदळले आहे. ‘नासा’ने अवकाशात फिरणाऱ्या डायमाॅरफस लघुग्रह आणि अंतराळयानची टक्कर घडवून आणली. हा लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास पृथ्वीला मोठा धोका होता. आता भविष्यात पृथ्वीवर कोणत्याही प्रकारचे लघुग्रह आदळण्याची शक्यता निर्माण झाली तर हे तंत्रज्ञान पृथ्वीला वाचवू शकते.

‘नासा’ने मंगळवारी सकाळी ही मोहीम यशस्वी केली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ४.४५ वाजता डार्ट अंतराळयानाची डायमॅारफस ॲस्ट्राॅयडसोबत टक्कर झाली. यामध्ये ‘नासा’चे अंतराळयान नष्ट झाले; पण ॲस्ट्राॅयडचा वेग आणि दिशा बदलण्यात ‘नासा’ला यश आले आहे. ‘नासा’ने अवकाशात फिरणाऱ्या डायमाॅरफस लघुग्रह आणि अंतराळयानची टक्कर घडवून आणली आहे. हा लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास पृथ्वीला मोठा धोका होता.

अशा उल्का म्हणजेच लघुग्रहांची टक्कर पृथ्वीच्या विनाशाला कारणीभूतही ठरू शकते. त्यामुळे ‘नासा’चे हे मिशन फार महत्त्वाचे होते आणि ते यशस्वी झाले आहे. डायमाॅरफस नावाच्या लघुग्रहाशी या डार्ट अंतराळयानाची टक्कर झाली आहे.

हे मिशन फत्ते करून ‘नासा’ने नवीन इतिहासच रचलाय.

लघुग्रहांची टक्कर पृथ्वीच्या विनाशाला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे ‘नासा’चे हे मिशन फार महत्त्वाचे होते. डार्ट अंतराळयानाला धडकलेल्या लघुग्रहाची लांबी ही १६९ मीटर होती. या धडकेमुळे लघुग्रहाची दिशा आणि वेग बदल्यात मदत झाली असून, त्यामुळे पृथ्वीवरील खूप मोठा धोका टळला आहे. ‘नासा’ला पृथ्वीच्या जवळ अंतराळ फिरणारे ८००० निअर अर्थ ऑब्जक्ट्स आढळलेत. हे ॲस्ट्राॅयड म्हणजे लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास पृथ्वीचा विनाश होऊ शकतो.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in