अलवर: येथील जिल्ह्यात मॉब लिंचिंगमध्ये एका मुस्लीम तरुणाचा मृत्यू झाला आहे. लाकूड कापायला गेलेल्या या तरुणाला बेदम मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तीन ते चार जणांना या प्रकरणी अटक केली आहे.
अलवार जिल्ह्यातील नारोल गावात शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. मृत तरुण वशीम हा दोघांसह लाकडे कापायला गेला होता. या भागात वनविभागाची गाडी फिरत असल्याची सूचना त्यांना मिळाली. त्यामुळे घाबरून त्यांनी लाकडे कापणे बंद केले. ते पळायला लागले. ही बाब गावकऱ्यांना कळताच त्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. त्यांना अडवून मारहाण केली. त्यात वशीमचा मृत्यू झाला.