
नवी दिल्ली : मोबाईलवर बोलणे व इंटरनेटचा वापर आता महाग होणार आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत मोबाईल कंपन्या बिलात १० ते १२ टक्के वाढ करू शकतात. याचा मोठा परिणाम मध्यम व महागड्या योजना घेणाऱ्या ग्राहकांना बसणार आहे.
उद्योगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मे महिन्यात वापरकर्त्यांची संख्या वाढली आहे. सलग पाचव्या महिन्यात वापरकर्ते वाढले. त्यामुळे दूरसंचार कंपन्यांमध्ये टॅरिफ वाढवण्याचे ठरत आहे. जुलै २०२४ मध्ये दूरसंचार प्लॅनचे दर वाढले होते. तेव्हा मूळ प्लॅन ११ ते २३ टक्के महाग झाले होते. आता दूरसंचार प्लॅन वाढल्यास ग्राहक सोडून जाऊ शकतात.
तज्ज्ञांनी सांगितले की, टॅरिफ वाढल्यास प्लानमध्ये मिळणारा डेटा कमी केला जाऊ शकतो. त्यामुळे ग्राहकांना आता अधिक डेटा पॅक खरेदी करावे लागू शकतात.
मे मध्ये ७४ लाख वापरकर्ते वाढले. त्यामुळे देशातील मोबाईल वापरकर्त्यांची संख्या १०८ कोटी झाली. रिलायन्स जिओने मेमध्ये ५ लाख नवीन वापरकर्ते जोडले. भारती एअरटेलने १३ लाख नवीन वापरकर्ते जोडले.
विश्लेषकांच्या मते, मूळ प्लान महाग झाल्याने कमी पैसे खर्च करणाऱ्या ग्राहकांवर दबाव वाढत आहे.
दूरसंचार क्षेत्रातील विश्लेषकाने सांगितले की, १० ते १२ टक्के टॅरिफ वाढू शकते. सर्व तऱ्हेच्या ग्राहकांवर भार टाकणे अयोग्य आहे. केवळ मध्यम व महागडे प्लॅन घेणाऱ्या ग्राहकांसाठी दरवाढ करणे योग्य ठरेल.