मोबाईलचा वापर रिल्ससाठी नको, शिक्षणासाठी करा! 'परीक्षा पे चर्चा'त पंतप्रधान मोदी यांचा सल्ला

मोबाईलचा वापर रिल्स बनवण्यासाठी न करता शिक्षणासाठी करा...चांगली झोप घ्या...स्पर्धेची भीती बाळगू नका...आदी महत्त्वाचे सल्ले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी मुलांना दिले.
मोबाईलचा वापर रिल्ससाठी नको, शिक्षणासाठी करा! 'परीक्षा पे चर्चा'त पंतप्रधान मोदी यांचा सल्ला

नवी दिल्ली : मोबाईलचा वापर रिल्स बनवण्यासाठी न करता शिक्षणासाठी करा...चांगली झोप घ्या...स्पर्धेची भीती बाळगू नका...आदी महत्त्वाचे सल्ले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी मुलांना दिले.

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांनी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात तीन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. जवळपास दोन तास १० मिनिटे मोदींनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

पंतप्रधान म्हणाले की, जीवनात स्पर्धा आवश्यक असून कोणताही दबाव झेलण्याच्या लायक आपल्याला बनवले पाहिजे. तसेच प्रत्येक वेळी आई-वडिलांनी मुलांना समजवायला जाऊ नये. कधी आई तर कधी वडील तर कधी मोठा भाऊ मुलांना बोलतात. मात्र, मुलांवर त्यांचा दबाव पडतो. तुलना केल्याने मुलांच्या मनात द्वेष पसरतो. आई-वडिलांनी आपल्या मुलाची अन्य मुलांसोबत स्पर्धा करू नये. मुलांचे मार्कशीट तुमचे व्हिजिटिंग कार्ड बनू नये, असा सल्ला त्यांनी दिला.

शिक्षकांनी संगीताच्या सहाय्याने मुलांचा वर्ग आनंदित करू शकतात. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संबंध चांगले केले पाहिजेत. शिक्षकांचे स्थान त्यांच्या जीवनात चांगले आहे, असे विद्यार्थ्यांना वाटत नाही. जेव्हा शिक्षक केवळ अभ्यासक्रमाबाहेर जाऊन विद्यार्थ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करतील तेव्हा मुले त्यांच्याशी सर्व तणावावर चर्चा करतील, असे पंतप्रधानांनी सांगितले.

परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांनी मन शांत ठेवावे. तणावाचा सामना करायला आपल्याला छोट्या छोट्या चुकांपासून वाचले पाहिजे. परीक्षा केंद्रात मित्रांसोबत थट्टामस्करी करा. दीर्घश्वास घ्या, त्यामुळे तुमच्या हातात पेपर आल्यानंतर तुम्हाला तणाव येणार नाही. परीक्षेत सर्वात मोठे आव्हान हे लिखाणाचे असते. त्यासाठी लिखाणाचा सराव करा, असे ते म्हणाले. परीक्षेच्या वेळी तुम्ही चांगली झोप घ्या. तसेच परीक्षेवेळी रात्री अभ्यास करू नका. त्याचबरोबर चांगल्या आहारावर लक्ष केंद्रित करा. आपले आरोग्य चांगले नसल्यास तुम्हाला परीक्षा व्यवस्थित देता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in