२१ वे शतक भारत, आसियानचे! 'आसियान'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

२१ वे शतक भारत व ‘आसियान’चे आहे. ‘आसियान व्हिजन २०४५’ आणि ‘विकसित भारत २०४७’ ही दोन्ही लक्ष्ये संपूर्ण जगाला चांगले दिवस आणतील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आसियन’ परिषदेला व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आसियन’ परिषदेला व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले.
Published on

नवी दिल्ली : २१ वे शतक भारत व ‘आसियान’चे आहे. ‘आसियान व्हिजन २०४५’ आणि ‘विकसित भारत २०४७’ ही दोन्ही लक्ष्ये संपूर्ण जगाला चांगले दिवस आणतील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आसियन’ परिषदेला व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. ते म्हणाले की, यंदाची ‘आसियान’ची संकल्पना ‘समावेशकता’ आणि ‘शाश्वतता’ अशी आहे. ही संकल्पना आमच्या कामातून दिसून येते. डिजिटल सुविधा सर्वांपर्यंत पोहचवणे, अन्न सुरक्षा व लॉजिस्टीक पुरवठा साखळी मजबूत करणे आदी बाबी आम्ही केल्या आहेत. भारत त्याचे पूर्णपणे समर्थन करतो. यासाठी भारत काम करायला तयार आहे. प्रत्येक अडचणीच्या काळात भारत ‘आसियान’ देशांसोबत उभा आहे. आपत्कालिन व्यवस्थापन, समुद्र सुरक्षा व सागरी अर्थव्यवस्था आदींमध्ये सहकार्य वेगाने वाढले आहे, असे ते म्हणाले.

२०२६ मध्ये भारत-आसियान सागरी सहकार्य वर्ष असेल. त्यात अभ्यास, पर्यटन, विज्ञान, आरोग्य, हरित ऊर्जा आणि सायबर सुरक्षा आदींचा समावेश असेल.

‘आसियान’ देशांशी पुन्हा भेटण्याची संधी मिळाली. भारत आणि आसियानमध्ये जगातील एक चतुर्थांश लोकसंख्या राहते. ‘आसियान’ संघटनेसोबत आमचे जुने व खोलवर संबंध आहेत. आमचे विचार व संस्कृती सामायिक आहे. आम्ही ‘ग्लोबल साऊथ’चा भाग आहोत. आमच्यात व्यापारासोबतच सांस्कृतिक संबंधही मजबूत आहेत, असे त्यांनी सांगितले.

भारताच्या ‘पूर्वेकडे पाहा’ धोरणाचा हिस्सा

‘आसियान’ हा भारताच्या ‘पूर्वेकडे पाहा’ धोरणाचा महत्त्वाचा भाग आहे. भारत हा कायमच ‘आसियान’चे नेतृत्व व ‘इंडो-पॅसिफीक’ क्षेत्रासाठी त्याच्या दृष्टीकोनाला पाठिंबा देतो. आजच्या कठीण प्रसंगी भारत व आसियानची मित्रता मजबूत झाली. आमचे संबंध जगाला स्थिरता व विकासाला आधार बनणारे आहेत, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in