मोदींना सायप्रसचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोमवारी सायप्रसमधील ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस-३’ हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. सायप्रस प्रजासत्ताकाचे पहिले अध्यक्ष मकारिओस-३ यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार राष्ट्राच्या प्रशंसनीय सेवेसाठी राष्ट्रप्रमुख आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींना प्रदान केला जातो.
मोदींना सायप्रसचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान
Published on

निकोसिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोमवारी सायप्रसमधील ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस-३’ हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. सायप्रस प्रजासत्ताकाचे पहिले अध्यक्ष मकारिओस-३ यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार राष्ट्राच्या प्रशंसनीय सेवेसाठी राष्ट्रप्रमुख आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींना प्रदान केला जातो.

निकोसिया येथील राष्ट्रपती निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइड्स निकोसिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोमवारी सायप्रसमधील ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस-३’ हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. सायप्रस प्रजासत्ताकाचे पहिले अध्यक्ष मकारिओस-३ यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार राष्ट्राच्या प्रशंसनीय सेवेसाठी राष्ट्रप्रमुख आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींना प्रदान केला जातो.

निकोसिया येथील राष्ट्रपती निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइड्स यांनी नरेंद्र मोदी यांना पुरस्‍कार प्रदान केला. या सन्‍मानाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी क्रिस्टोडोलाइड्स यांच्यासह सायप्रसच्या जनतेचे आभार मानले.

१४० कोटी भारतीयांचा सन्मान - पंतप्रधान

सायप्रसमधील सर्वोच्च सन्मान ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस-३’ या पुरस्काराने माझा सन्मान करण्यात आला याबद्दल मी सायप्रस सरकारचे आणि जनतेचे मनापासून आभार मानतो. हा सन्मान फक्त माझा नाही, तर १४० कोटी भारतीयांचा सन्मान आहे, असे यावेळी मोदींनी नमूद केले.

‘जी-७’साठी कॅनडात आगमन

कॅननॅस्किस येथे होणाऱ्या ‘जी-७’ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोमवारी संध्याकाळी कॅनडामधील कॅलगरी येथे आगमन झाले. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या निमंत्रणावरून मोदी कॅनडा दौऱ्यावर गेले आहेत. १६-१७ जून रोजी होणारी ‘जी-७’ गटाच्या देशांसोबत मोदींची ही सलग सहावी उपस्थिती ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in