मोदी सरकारसमोर कधीही झुकणार नाही; शरद पवारांचा इशारा

२०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत.
मोदी सरकारसमोर कधीही झुकणार नाही; शरद पवारांचा इशारा

“शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर हे आमचे प्रेरणास्थान आहेत. शिवाजी महाराज दिल्लीसमोर कधीच झुकले नाहीत. बाजीराव पेशवे यांनी तालकटोरा स्टेडियममधूनच दिल्लीला आव्हान दिले,” असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट मोदी सरकारसमोर झुकणार नसल्याचा इशारा दिला आहे.

दिल्लीत रविवारपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आठवे अधिवेशन सुरू झाले. दोनदिवसीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

२०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनेही महाराष्ट्राबाहेर पक्षाचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटक आणि हरियाणात ताकदीने पक्षविस्तार करण्याची शक्यता आहे.

पवार पुन्हा अध्यक्षपदी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड करण्यात आली आहे. शरद पवार यांना पुढील चार वर्षांसाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आले आहे. नवी दिल्लीतील तालकटोरा मैदानात सुरू असलेल्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in