अखेर मोदी-जिनपिंग भेटीचा मुहूर्त ठरला; रविवारी द्विपक्षीय चर्चा, ट्रम्प 'टॅरिफ 'वरही होणार चर्चा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत सुरू झालेल्या 'टॅरिफ वॉर' दरम्यान आता पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीचा मुहूर्त ठरला आहे.
अखेर मोदी-जिनपिंग भेटीचा मुहूर्त ठरला; रविवारी द्विपक्षीय चर्चा, ट्रम्प 'टॅरिफ 'वरही होणार चर्चा
Published on

नवी दिल्ली: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत सुरू झालेल्या 'टॅरिफ वॉर' दरम्यान आता पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीचा मुहूर्त ठरला आहे. तियानजिन येथे रविवारी होणाऱ्या 'शांघाय सहकार्य संघटने'च्या शिखर परिषदेच्या वेळी मोदी-जिनपिंग भेट होणार आहे. 'एससीओ' शिखर परिषदेच्या वेळी म्हणजे ३१ ऑगस्ट रोजी दोन्ही नेते भेटणार असल्याची माहिती समोर आली आहे.

जपानचा दोन दिवसांचा दौरा संपल्यानंतर, मोदी हे जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून 'एससीओ' शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी चीनमध्ये जाणार आहेत. या द्विपक्षीय चर्चेत ट्रम्प टॅरिफवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. भारतातील चीनचे राजदूत झू फेहोंग म्हणाले की, एससीओ शिखर परिषदेसाठी मोदींचा तियानजिन दौरा दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये सुधारणा आणि विकासाला एक नवीन चालना देईल. ही भेट यशस्वी करणे खूप महत्वाचे आहे, आम्ही या भेटीला खूप महत्त्व देतो.

वास्तविक नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या गलवान खोऱ्यातील संघर्षानंतरचा हा पहिलाच दौरा असणार आहे. २०२४ मध्ये रशियातील कझान येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या वेळी दोन्ही नेत्यांची बैठक झाली होती. भारत आणि चीनमध्ये चार वर्षांपासून सुरू असलेला सीमा संघर्ष संपविण्यासाठी 'एलएसी' वर गस्त घालण्याचा करार द्विपक्षीय चर्चेत करण्यात आला.

logo
marathi.freepressjournal.in