आजचा कार्यक्रम अनेकांची झोप उडवेल - मोदी

विझिंजम बंदराच्या उद्घाटनप्रसंगी मोदींसोबत केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि काँग्रेस खासदार शशी थरूर हे व्यासपीठावर एकत्र आले होते.
आजचा कार्यक्रम अनेकांची झोप उडवेल - मोदी
एक्स @narendramodi
Published on

तिरुवनंतपुरम : विझिंजम बंदराच्या उद्घाटनप्रसंगी मोदींसोबत केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि काँग्रेस खासदार शशी थरूर हे व्यासपीठावर एकत्र आले होते. यावेळी मोदी यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात अस्वस्थता वाढली आहे. मोदी म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की,ते इंडिया आघाडीचे एक मजबूत आधारस्तंभ आहेत. शशी थरूरही बसले आहेत, आजच्या कार्यक्रमामुळे अनेकांची झोप उडेल. जिथे संदेश जायचा होता तिथे गेला आहे. मोदींच्या या वाक्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

अस्वस्थता वाढली

काँग्रेस खासदार शशी थरूर हे काँग्रेसचे तिरुवनंतपुरम लोकसभेचे खासदार आहेत. जे इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्सचे (इंडिया) एक प्रमुख सदस्य आहे. मोदींनी हे वक्तव्य जरी विनोदाने केले असले, तरी राजकीय प्रतिस्पर्ध्यांना अस्वस्थ करण्याच्या उद्देशाने ते होते असे दिसून आले.

logo
marathi.freepressjournal.in