दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशाला तुम्ही स्वीकारणार का? मोदींनी शरीफ यांच्यासमोरच पाकिस्तानला चीनमधून फटकारले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पहलगामध्ये करण्यात आलेला दहशतवादी हल्ला आणि दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानचा नामोल्लखे टाळत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या उपस्थितीतच पाकिस्तानला चांगलेच फटकारले.
दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशाला तुम्ही स्वीकारणार का? मोदींनी शरीफ यांच्यासमोरच पाकिस्तानला चीनमधून फटकारले
Photo: X (PTI)
Published on

तिआनजिन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पहलगामध्ये करण्यात आलेला दहशतवादी हल्ला आणि दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानचा नामोल्लखे टाळत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या उपस्थितीतच पाकिस्तानला चांगलेच फटकारले. इतकेच नव्हे तर दहशतवादाला उघडपणे पाठिंबा देणारा देश आपल्यापैकी कोणालाही स्वीकारार्ह वाटेल का, असा सवालही मोदी यांनी उपस्थितांना केला. तसेच, अमेरिकेलाही त्यांच्या संरक्षणवादी, एकतर्फी आणि वर्चस्ववादी वृत्तीबद्दल मोदींनी फटकारले.

उघड आव्हान

चीनच्या तिआनजिन शहरात २५ वी शांघाय सहकार्य परिषद (एससीओ) होत आहे. या परिषदेसाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासह अनेक देशांचे प्रमुख उपस्थित आहेत. मोदी म्हणाले की, पहलगाम दहशतवादी हल्ला हा केवळ भारताच्या आत्मा असलेल्या जम्मू आणि काश्मीरवरच हल्ला नव्हता तर मानवतेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व देशांना एक उघड आव्हान होते. त्यामुळे दहशतवादाला उघडपणे पाठिंबा देणारा देश आपल्यापैकी कोणालाही स्वीकारार्ह वाटेल का, असा सवाल त्यांनी केला. आपण सर्वांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाशी लढले पाहिजे आणि त्याचा विरोध केला पाहिजे. मानवतेप्रती ही आपली जबाबदारी आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in