स्वदेशी प्रत्येकाचे ध्येय असावे - मोदी

स्वदेशी हे प्रत्येकाच्या जीवनाचा मंत्र असला पाहिजे. आपल्या सरकारच्या 'मेक इन इंडिया' उपक्रमामुळे जागतिक आणि देशांतर्गत उत्पादकांसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले.
स्वदेशी प्रत्येकाचे ध्येय असावे - मोदी
Published on

अहमदाबाद : स्वदेशी हे प्रत्येकाच्या जीवनाचा मंत्र असला पाहिजे. आपल्या सरकारच्या 'मेक इन इंडिया' उपक्रमामुळे जागतिक आणि देशांतर्गत उत्पादकांसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले. गुजरातच्या हंसरपूर येथील मारुती सुझुकीच्या कारखान्यात कंपनीच्या पहिल्या इलेक्ट्रिक वाहन 'ई-विटारा'ला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी मोदी म्हणाले की, "गुंतवणूक कोणाची आहे हे महत्त्वाचे नाही, पण उत्पादनासाठी केलेले श्रम भारतीयांचे असले पाहिजेत, हे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने मारुती सुझुकीही एक स्वदेशी कंपनी आहे. स्वदेशी हा प्रत्येक भारतीयाचा जीवनमंत्र असावा.

गेल्या दशकात भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन ५०० टक्क्यांनी, मोबाईल उत्पादन २,७०० टक्क्यांनी आणि

संरक्षण उत्पादन २०० टक्क्यांनी वाढले असल्याचे त्यांनी सांगितले. भारताकडे लोकशाहीची ताकद, लोकसंख्येचा लाभ आणि कुशल कामगारांचा प्रचंड साठा आहे, असे मोदी म्हणाले. "यामुळे आमच्या प्रत्येक भागीदारासाठी ही 'विन-विन' परिस्थिती निर्माण झाली आहे," असे त्यांनी म्हटले. ते म्हणाले, "भारत येथेच थांबणार नाही. ज्या क्षेत्रात आपण चांगली कामगिरी केली आहे, त्यात अजून पुढे जाणार आहोत. म्हणूनच आम्ही 'मिशन उत्पादना'वर भर देत आहोत. आगामी काळात आमचा भर भविष्यातील उद्योगांवर असेल."

logo
marathi.freepressjournal.in