शरद पवारांच्या पंतप्रधान पदाबाबत मोदींचं मोठं वक्तव्य ; म्हणाले, "काँग्रेसने स्वार्थासाठी..."

प्रफुल्ल पटेल यांनी देखील शरद पवार यांनी ठाम भूमिका न घेतल्याने त्यांची पंतप्रधान पदाची संधी हुकल्याची खंत व्यक्त केली आहे.
शरद पवारांच्या पंतप्रधान पदाबाबत मोदींचं मोठं वक्तव्य ; म्हणाले, "काँग्रेसने स्वार्थासाठी..."

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात जात भाजप प्रणित शिंदे सरकारशी हातमिळवणी करत सत्तेत सामील झाले. काही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही शरद पवार यांचीच खेळी असल्याचं म्हटलं. राजकीय वर्तुळातून देखील ही शरद पवार यांचीच खेळी असल्याचं म्हटलं जाऊ लागलं. त्यानंतर पुणे येथे लोकमान्य टिळक पुरस्काराच्या वितरण सोहळ्याला विरोधी पक्षांचा विरोध जुगारुन शरद पवार हे पंतप्रधान मोदी यांच्या समवेत व्यासपीठावर उपस्थित राहीले. यामुळे पवारांच्या डोक्यात नेमकं सुरु काय आहे. याबाबत अनेकांच्या मनात कुतुहल निर्माण झालं. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

काँग्रेसच्या स्वर्थामुळे प्रणव मुखर्जी आणि शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना पंतप्रधान पदाची संधी हुकली. असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी एनडीएमधून बाहेर पडलेल्या पक्षांचा देखील दाखला दिला. मोदींनी केलेल्या वक्तव्यानंतर शरद पवारांच्या पंतप्रधान पदाची संधी हुकल्याची चर्चा पुन्हा होऊ लागली आहे. पवार यांनी चार वेळा महाराष्ट्रा सारख्या बड्या राज्याचं मुख्यमंत्री पद भूषवलं आहे. तसंच देशाचं संरक्षण मंत्री पद आणि कृषी मंत्री पद देखील त्यांनी भूषवलं. मात्र. त्यांना अद्याप पंतप्रधान होता आलं नाही. प्रफुल्ल पटेल यांनी देखील शरद पवार यांनी ठाम भूमिका न घेतल्याने त्यांची पंतप्रधान पदाची संधी हुकल्याची खंत व्यक्त केली आहे. यानंतर आता खुद्द पंतप्रधान मोदींनी या या विषयावर भाष्य केलं आहे.

या विषयावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, स्वार्थामुळे काँग्रेसने प्रणव मुखर्जी आणि शरद पवार यांच्या सारख्या दिग्गज नेत्यांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली नाही. काँग्रेसने त्यांच्या वयक्तीक स्वार्थामुळे अनेक नेत्यांच खच्चीकरण केलं. भाजप मात्र काँग्रेसप्रमाणे अहंकारी नाही. त्यामुळे भाजप सत्तेतून पायउतार होणार नाही, असं मोदी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in