दरापासून विमानतळापर्यंत सर्वच ठिकाणी मोदी यांचे नियंत्रण ;काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा आरोप

या सभेत खर्गे म्हणाले की, काँग्रेस लोकांच्या समस्यांच्या निवारणासाठी काम करील. पंतप्रधान नरेंद्र मोदी कदाचित याच भागात दौरा करीत असतील
दरापासून विमानतळापर्यंत सर्वच ठिकाणी मोदी यांचे नियंत्रण ;काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा आरोप

जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंदरापासून विमानतळापर्यंत सर्वच ठिकाणी नियंत्रण असून लोकांना गुलाम बनविण्यासाठी ते काम करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राजस्थानातील श्रीगंगानगर जिल्ह्यातील अनुपगड येथील निवडणूक प्रचारसभेत केला.

या सभेत खर्गे म्हणाले की, काँग्रेस लोकांच्या समस्यांच्या निवारणासाठी काम करील. पंतप्रधान नरेंद्र मोदी कदाचित याच भागात दौरा करीत असतील. कारण आम्ही जेव्हा एखाद्या ठिकाणी जाऊ इच्छितो तेव्हा तेथे उड्डाण करण्यास आम्हाला परवानगी दिली जात नाही. याचा अर्थ प्रत्येक गोष्ट त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. हवा, जमीन, बंदरे आणि विमानतळ प्रत्येक ठिकाणी त्यांचे नियंत्रण आहे, असाही दावा त्यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोमवारी राजस्थानमध्ये काही ठिकाणी दौरा आहे.

खर्गे म्हणाले, "ते आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न करू शकतात. पण आम्ही घाबरणार नाही. आम्ही गरीबांसाठी लढू आणि त्यांच्या अडचणी दूर करू." राजस्थानमधील सर्व २०० विधानसभा मतदारसंघांत २५ नोव्हेंबरला मतदान होणार असून ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in