मोदींची हमी हीच महागाईची हमी - जयराम रमेश

खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे किरकोळ महागाई आता ५.५ टक्क्यांवर पोहोचली आहे
मोदींची हमी हीच महागाईची हमी - जयराम रमेश
PM
Published on

नवी दिल्ली : मोदींची हमी हीच महागाईची हमी आहे, असे सांगत काँग्रेसने बुधवारी जीवनावश्यक वस्तूंच्या ‘गगनाला भिडलेल्या किमती’ बद्दल सरकारवर जोरदार शरसंधान केले.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी हा आरोप केला. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महागाई नियंत्रणात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. हे ‘अपयश’ लपवण्यासाठी ते विविध मुद्दे मांडत राहतात. एक्सवरील पोस्टमध्ये जयराम रमेश यांनी ही टीका केली. ते म्हणाले की, आजकाल भाजप पंतप्रधानांच्या हमीभावाबद्दल बोलत आहे. त्यांच्या इतर हमींची माहिती नाही, पण गेल्या साडेनऊ वर्षात देशाला मिळालेली एक हमी म्हणजे महागाईची हमी. या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाईने ४५ वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सतत गगनाला भिडत आहेत. खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे किरकोळ महागाई आता ५.५ टक्क्यांवर पोहोचली आहे, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in