‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदींंचा देशवासीयांशी संवाद,म्हणाले आणीबाणीच्या काळा...

भारतातल्या लोकांनी लोकशाही पद्धतीनेच आणीबाणी हटवून, पुन्हा एकदा लोकशाहीची स्थापना केली
 ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदींंचा देशवासीयांशी संवाद,म्हणाले आणीबाणीच्या काळा...

भारतीय जनतेवर अनेक युगांपासून लोकशाहीचे संस्कार झाले आहेत. सर्वांमध्ये लोकशाहीची जी भावना नसा-नसांमध्ये भिनली आहे, शेवटी त्याच भावनेचा विजय झाला. भारतातल्या लोकांनी लोकशाही पद्धतीनेच आणीबाणी हटवून, पुन्हा एकदा लोकशाहीची स्थापना केली. हुकूमशाहीच्या मानसिकतेचा, हुकूमशाहीच्या वृत्ती-प्रवृत्तीचा लोकशाहीच्या पद्धतीने पराभव केला जाणे, असे उदाहरण संपूर्ण जगामध्ये पाहायला मिळणे अवघड आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.

मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधला. ‘मन की बात’च्या माध्यमातून पंतप्रधानांनी देशातील आणीबाणीची परिस्थिती आणि युवकांवर संवाद साधला ते म्हणाले की, “तुमचे आई-वडील तुमच्या वयाचे होते, त्यावेळी एकदा त्यांच्याकडून जगण्याचा अधिकारच काढून घेतला होता, हे तुम्हा मंडळींना माहिती आहे का? माझ्या नवतरुण मित्रांनो, आपल्या देशामध्ये मात्र, एकदा असे घडले होते. १९७५ सालची ही गोष्ट आहे. जून महिन्यात, म्हणजे याच काळात देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्यामध्ये देशातल्या नागरिकांचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले होते. घटनेतल्या कलम २१ अंतर्गत सर्व भारतीयांना मिळाला आहे- ‘राइट टू लाईफ’ आणि ‘पर्सनल लिबर्टी’- म्हणजेच ‘जगण्याचा आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क!’ त्या काळी भारतातल्या लोकशाहीला पायदळी तुडविण्याचा प्रयत्न केला गेला. न्यायालये, प्रत्येक घटनादत्त संस्था, प्रकाशन संस्था - वर्तमानपत्रे, अशा सर्वांवर नियंत्रण, अंकुश लावले होते. लावलेल्या सेन्सॉरशिपमुळे सरकारच्या स्वीकृतीविना काहीही छापणे, प्रसिद्ध करणे शक्य नव्हते.

त्या काळी हजारो लोकांना अटक केली गेली आणि लाखो लोकांवर अत्याचार केल्यानंतरही भारतातल्या लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास डळमळीत झाला नाही की, हा विश्वास कणभरही कमी झाला नाही. आणीबाणीच्या काळामध्ये देशवासीयांच्या संघर्षाचे साक्षीदार होण्याचे, लोकशाहीचा एक सैनिक या नात्याने - या घटनेचा भागीदार होण्याचे भाग्य मलाही मिळायचे होते. देश आपल्या स्वातंत्र्याचा ७५वा वर्धापनदिन म्हणजेच अमृतमहोत्सव साजरा करीत आहे, त्यावेळीही आणीबाणीचा तो भयावह काळ आपण कधीच विसरून चालणार नाही,” असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in