भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीसह २६ खेळाडूंना अर्जून पुस्काराने गौरवणार; क्रीडा मंत्रालयाकडून घोषणा

9 जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते या सर्व क्रीडा पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. क्रीडा मंत्रालयाने याबाबतची घोषणा केली आहे.
भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीसह २६ खेळाडूंना अर्जून पुस्काराने गौरवणार; क्रीडा मंत्रालयाकडून घोषणा

यावर्षीच्या क्रीडा पुरस्कारासाठी खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत. भारताचा स्टार गोलंदाज आणि यंदाच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकात चमदार कामगिरी करणाऱ्या मोहम्मद शमीला अर्जुन पुस्काराने गौरवण्यात येणार आहे. तर खेलरत्न पुरस्कार बॅडमिंटन स्टार जोडी चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकिरेड्डी यांना देण्यात येणार आहे. 9 जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते या सर्व क्रीडा पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. क्रीडा मंत्रालयाने याबाबतची घोषणा केली आहे.

क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेटर मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. तर चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 ने समान्मानित केले जाणार आहे. खेळाडूंनी त्यांच्या खेळात केलेल्या चमकदार कामगिरीबद्दल हे पुरस्कार दिले जाणार आहेत. समित्यांनी केलेल्या शिफारशींच्या आधारे आणि योग्य तपासानंतर सरकारने या सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. तसेच पुरस्कार प्राप्त खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांची यादी प्रसिद्ध केली आहे.

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023

  1. चिराग चंद्रशेखर शेट्टी (बॅडमिंटन)

  2. रँकीरेड्डी सात्विक साई राज (बॅडमिंटन)

उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार 2023

  1. ओजस प्रवीण देवतळे (तिरंदाजी)

  2. अदिती गोपीचंद स्वामी (तिरंदाजी)

  3. श्रीशंकर एम (अॅथलेटिक्स)

  4. पारुल चौधरी (अॅथलेटिक्स)

  5. मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग)

  6. आर वैशाली (बुद्धिबळ)

  7. मोहम्मद शमी (क्रिकेट)

  8. अनुष अग्रवाला (अश्वस्वार)

  9. दिव्यकृती सिंग (अश्वस्वार ड्रेसेज)

  10. दिक्षा डागर (गोल्फ)

  11. कृष्ण बहादूर पाठक (हॉकी)

  12. पुक्रंबम सुशीला चानू (हॉकी)

  13. पवन कुमार (कब्बडी)

  14. रितू नेगी (कब्बडी)

  15. नसरीन (खो-खो)

  16. सुश्री पिंकी (लॉन बाऊल्स)

  17. ऐश्वरी प्रताप सिंग तोमर (शूटिंग)

  18. सुश्री ईशा सिंग (नेमबाजी)

  19. हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॉश)

  20. अहिका मुखर्जी (टेबल टेनिस)

  21. सुनील कुमार (कुस्ती)

  22. सुश्री अँटिम (कुस्ती)

  23. नौरेम रोशिबिना देवी (वुशू)

  24. शीतल देवी (पॅरा तिरंदाजी)

  25. इलुरी अजय कुमार रेड्डी (अंध क्रिकेट)

  26. प्राची यादव (पॅरा कॅनोइंग)

उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार 2023

  1. ललित कुमार (कुस्ती)

  2. आर.बी. रमेश (बुद्धिबळ)

  3. महावीर प्रसाद सैनी (पॅरा अॅथलेटिक्स)

  4. शिवेंद्र सिंग (हॉकी)

  5. गणेश प्रभाकर देवरुखकर (मल्लखांब)

logo
marathi.freepressjournal.in