हिंदू संस्कृती नष्ट झाल्यास हे जग नष्ट होईल - सरसंघचालक

हिंदू संस्कृती अमर आहे, जर हिंदू संस्कृती नष्ट झाली तर संपूर्ण जग नष्ट होईल, असे मोठे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी मणिपूर येथे एका सभेत केले आहे. मणिपूरमध्ये झालेल्या पहिल्यांदाच हिंसाचारानंतर सरसंघचालक मणिपूरच्या दौऱ्यावर आले आहेत.
हिंदू संस्कृती नष्ट झाल्यास हे जग नष्ट होईल - सरसंघचालक
एएनआय
Published on

इम्फाळ : हिंदू संस्कृती अमर आहे, जर हिंदू संस्कृती नष्ट झाली तर संपूर्ण जग नष्ट होईल, असे मोठे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी मणिपूर येथे एका सभेत केले आहे. मणिपूरमध्ये झालेल्या पहिल्यांदाच हिंसाचारानंतर सरसंघचालक मणिपूरच्या दौऱ्यावर आले आहेत.

हिंदू संस्कृतीचे कौतुक

जगातील सर्व देशांनी सर्व प्रकारची परिस्थिती बघितली आहे. ग्रीसमध्ये युआन, इजिप्तची मिस्र, रोमची एक वेगळी संस्कृती होती. या संस्कृती नष्ट झाल्या आहेत, मात्र हिंदू संस्कृती टिकून आहे. आपल्या संस्कृतीत काहीतरी नक्की आहे. ज्यामुळे आपण अजूनही टिकून आहोत, अशा शब्दांत मोहन भागवत यांनी हिंदू संस्कृतीचे कौतुक केले.

भारत हे एका अशा सभ्यतेचे, संस्कृतीचे नाव आहे जी अमर आहे, आपण आपल्या समाजात एक असे बंधन तयार केले आहे की, ज्यामुळे हिंदू समाज हा कायम येथे राहणार आहे, जर हिंदू नष्ट झाले तर हे जग नष्ट होईल, असेही ते म्हणाले.

मणिपूर दौरा

गेल्या अडीच वर्षांपासून मणिपूर धगधगत आहे. कुकी आणि मैतेई समाजात उसळलेल्या हिंसाचारामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला, हजारो लोकांनी स्थलांतर केले आणि मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. सध्या मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट असून या हिंसाचारानंतर प्रथमच मोहन भागवत तेथे दौऱ्यावर आले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in