केवळ भारतच युद्ध थांबवू शकतो! अनेक देशांचा हवाला देत मोहन भागवत यांचे मत, युद्ध म्हणजे स्वार्थी हितसंबंधांचे परिणाम...

'जगात संघर्षांचे खरे कारण स्वार्थी हितसंबंध आणि वर्चस्वाची इच्छा हे आहे. स्थायी शांती केवळ एकता, अनुशासन आणि धर्माचे पालन केल्यानेच प्राप्त होऊ शकते. तसेच अनेक देशांच्या मते भारतच इराण-इस्त्रायल युद्ध संपवण्यासाठी मदत करू शकतो', असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शुक्रवारी सांगितले.
मोहन भागवत | संग्रहित छायाचित्र
मोहन भागवत | संग्रहित छायाचित्र
Published on

नागपूर : 'जगात संघर्षांचे खरे कारण स्वार्थी हितसंबंध आणि वर्चस्वाची इच्छा हे आहे. स्थायी शांती केवळ एकता, अनुशासन आणि धर्माचे पालन केल्यानेच प्राप्त होऊ शकते. तसेच अनेक देशांच्या मते भारतच इराण-इस्त्रायल युद्ध संपवण्यासाठी मदत करू शकतो', असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शुक्रवारी सांगितले.

भागवत नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयाची कोनशिला ठेवल्यानंतर एका सभेला संबोधित करत होते. ते म्हणाले, 'गेल्या २,००० वर्षांपासून जगाने संघर्ष सोडवण्यासाठी अनेक विचारांवर प्रयोग केले आहेत, परंतु त्यांना फारसे यश मिळालेले नाही'.

भारत मानवतेच्या नियमाचे पालन करतो, तर जगातील इतर देश 'योग्यतमची उत्तरजीविता' (सायवल ऑफ द फिटेस्ट) यावर विश्वास ठेवतात. भारताचा स्वभावच असा आहे जो सलोख्यावर विश्वास ठेवतो. याच कारणामुळे जगभरातून हा आवाज उठत आहे की, भारतच इराण-इस्त्रायल युद्ध संपवण्यासाठी मदत करू शकतो, असे ठाम मत सरसंघचालकांनी व्यक्त केले.

आरएसएस'चे काम वेगाने वाढतेय...

नागपूरमध्ये एका मराठी वृत्तपत्राला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भागवत यांनी सांगितले की, स्वयंसेवकांना मजबूत करण्यासाठी आणि काम अधिक चांगले करण्यासाठी संघटनेत बदल करण्यात आले आहेत. भागवत म्हणाले की, 'आरएसएस'चे काम खूप वेगाने वाढत आहे आणि लोकांच्या अपेक्षाही वाढत आहेत, त्यामुळे आता कामाचे वेगवेगळ्या भागांमध्ये विभाजन करून विकेंद्रीकरणाची सुरुवात केली जात आहे.

संघाच्या कार्यपद्धतीत बदल अशक्य

ते म्हणाले की, पूर्वी, 'आरएसएस'मध्ये ४६ प्रांत होते, आता ते वाढवून लहान युनिट्स म्हणजेच ८६ विभागांमध्ये विभागले जातील, जेणेकरून स्थानिक पातळीवर काम सहज आणि चांगल्या प्रकारे होऊ शकेल. भागवत म्हणाले की, संघाच्या कार्यपद्धतीत बदल होणार नाही. मैत्री करून आणि चांगली उदाहरणे देऊन समाजात बदल घडवून आणणे हेच संघाचे मुख्य कार्य आहे आणि ते पुढेही चालू राहील.

धर्म, लोकांच्या वर्तनातही दिसावा...

धार्मिक असहिष्णुता, सक्तीचे धर्मातर आणि उच्च-नीचतेची भावना आजही अस्तित्वात आहे. भारताचे प्राचीन ज्ञान आपल्याला शिकवते की सर्वजण एकमेकांशी जोडलेले आहेत आणि एक आहेत. धर्म केवळ शास्त्रांपुरता मर्यादित नसावा, तर लोकांच्या वर्तनातही तो दिसला पाहिजे. शिस्त आणि नैतिक मूल्यांचे पालन करण्यासाठी सतत सराव आवश्यक आहे आणि यात अनेकदा वैयक्तिक अडचणीही येतात.

logo
marathi.freepressjournal.in