गाझियाबादचे मोहित पांडे अयोध्येच्या राम मंदिराचे पुजारी

मंदिर परिसरात दुधेश्वर वेद विद्यापीठ आहे. देशभरातील विद्यार्थी शिक्षणासाठी इथे येतात. सध्या या विद्यापीठात ७० विद्यार्थी शिकतात.
गाझियाबादचे मोहित पांडे अयोध्येच्या राम मंदिराचे पुजारी

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना २२ जानेवारीला होईल. त्यासाठीच्या निमंत्रण पत्रिकांचं वाटप सुरू आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र मोदी उपस्थित असतील. गाझियाबादमधील विद्यार्थी मोहित पांडेला अयोध्या राम मंदिरातील पुजारी म्हणून निवडण्यात आले आहे.

मोहित पांडेने दुधेश्वर वेद विद्यापीठात ७ वर्षे अभ्यास केला. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तो तिरुपतीला गेला. मंदिराचे पुजारी निवडण्यासाठी ३ हजार जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यातून ५० जणांची निवड करण्यात आली आहे. नियुक्तीआधी त्यांना ६ महिने प्रशिक्षण देण्यात येईल. राम मंदिरात पुजारी म्हणून मोहितची निवड झाल्याबद्दल दुधेश्वर नाथ मंदिराचे महंत नारायण गिरी यांनी आनंद व्यक्त केला.

मोहितची निवड संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याचं महंत नारायण गिरी म्हणाले. राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आचार्य तपोराज उपाध्याय आणि आचार्य नित्यानंद यांनाही आमंत्रण दिले. गाझियाबादमधील दुधेश्वरनाथ मंदिर प्रसिद्ध आहे. उत्तर भारतातील प्रमुख मंदिरांमध्ये या मंदिराचा समावेश होतो. देशविदेशातून इथे भाविक येतात.

मंदिर परिसरात दुधेश्वर वेद विद्यापीठ आहे. देशभरातील विद्यार्थी शिक्षणासाठी इथे येतात. सध्या या विद्यापीठात ७० विद्यार्थी शिकतात. दुधेश्वर वेद विद्यापीठात शिकलेले विद्यार्थी पुढे देशपरदेशातील मंदिरांमध्ये आचार्य म्हणून सेवा देतात. मोहित पांडेनं आधी सामवेदाचा अभ्यास केला. त्यानंतर व्यंकटेश्वर वैदिक विद्यापीठात शिक्षण घेतलं. आचार्य म्हणून शिक्षण घेतल्यानंतर मोहित पांडे आता पीएचडीची तयारी करत आहे. मोहितनं दुधेश्वर वेद विद्यापीठात सात वर्षं धर्म आणि कर्मकांडाचं शिक्षण घेतलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in