मान्सून गोव्यात इलो; राज्यभर मान्सूनपूर्व सरी

केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सूनने आता गोव्यात धडक दिली असून तो महाराष्ट्राच्या वेशीवर पोहोचला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी अत्यंत अनुकूल वातावरण असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सूनने आता गोव्यात धडक दिली असून तो महाराष्ट्राच्या वेशीवर पोहोचला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी अत्यंत अनुकूल वातावरण असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यंदा मान्सूनचा प्रवास नेहमीपेक्षा तीन दिवस उशिराने सुरू झाला आहे.

हवामान विभागानुसार, राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने राज्यातील ३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि २४ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

यावर्षी उशिराने दाखल झालेला मान्सून महाराष्ट्रात स्थिर होण्यास काही काळ घेण्याचा अंदाज आहे. तर, मान्सून दाखल होईपर्यंत राज्यात बहुतांश ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा जोर कायम राहील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सामान्यतः १ जून रोजी केरळमध्ये येणारा मान्सून यंदा ३ जून रोजी दाखल झाला, तरीही मोसमी वारे राज्यात वेळेत पोहोचतील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाचे तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४८ तासांत दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण भागात मान्सूनचा पाऊस दाखल होईल.

logo
marathi.freepressjournal.in