चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील तापमान अनपेक्षित ; शास्त्रज्ञ देखील चक्रावले

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचून विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरमध्ये गुंतलेले पेलोड चंद्राचं रहस्य शोधण्याचा प्रयत्न करत आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील तापमान अनपेक्षित ;  शास्त्रज्ञ देखील चक्रावले

'चंद्रयान-३'च्या यशस्वी लँडिंगमुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील एक मोठी बातमी समोर आली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचून विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरमध्ये गुंतलेले पेलोड चंद्राचं रहस्य शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

सर्वप्रथम चंद्रावर उतरून तेथील नवीन वातावरणात विक्रम लँडरने चंद्रावरील तापमाची बातमी दिली आहे. आता पर्यंत पृष्ठभागाच्या खाली आणि वर नेमके किती तापमान आहे. या संदर्भात अचूक महिती समोर आली आहे. खोलीनुसार तापमानात कसा बदल होतो यांचा अंदाज त्यातून मिळाला आहे. विक्रम लँडरवर सरफेस थर्मोफिजिकल एकस्पेरिमेंट अर्थात 'चास्टे'वर विविध प्रकारचे १० तापमानकारक सेन्सर लावण्यात आले आहेत. जेणे करून ते पृष्ठभागाखाली १० सेंटीमीटर जाऊन तापमान मोजू शकतात.

चंद्रांच्या तापमानबद्दल प्राप्त झालेल्या माहितीनुसार चंद्राच्या पृष्ठभागावरील तापमान सुमारे २० डिग्री सेल्सियस ते ३० डिग्री सेल्सियस असण्याची अपेक्षा आहे, पण चंद्राच्या पृष्ठभागावर कमाल तापमान दुप्पटीने आहे. ७० अंश सेल्सियस होते. हीच माहिती देत इस्रोने तापमानाचा आलेख जाहीर केला आहे.

चंद्राच्या पृष्ठभागावरील आणि पृष्ठभागाखाली तापमानाची माहिती मिळाल्यानंतर शास्रज्ञांनी देखील आश्चर्य व्यक्त केलं आहे. पृथ्वीवर दोन ते तीन सेंटीमीटर खोलीवर आपल्याला दोन ते तीन अंश सेल्सिअसचा फरक क्वचितच दिसतो, तर चंद्रावर हा फरक ५० अंश सेल्सिअस असतो, अशी माहिती शास्रज्ञ बीएचएम दारुकेशा यांनी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in