युपीआयने घेतली मोठी आघाडी; आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले

युपीआयच्या माध्यमातून देशात 9 अब्जांपेक्षा अधिकचा व्यवहार झाला आहे.
युपीआयने घेतली मोठी आघाडी; आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले

युपीआयने पुन्हा एकदा मोठी आघाडी घेतली आहे. आतापर्यंतच्या व्यवहारांचे सर्व रेकॉर्ड यूपीआयने मोडून काढले असल्याची माहिती राष्ट्रीय देयके महामंडळाने गुरुवारी दिली आहे. त्यानुसार, युनिफाईड पेमेंट इंटरपेस द्वारे या वर्षात मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले आहेत. यावर्षी मे मध्ये हा व्यवहार 9 अब्जापर्यंत वाढला. मात्र, असं असताना रोखीतील व्यवहारात देखील वाढ होत आहे.

एनपीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, युपीआयच्या माध्यमातून देशात 9 अब्जांपेक्षा अधिकचा व्यवहार झाला आहे. मोबाईच्या माध्यमातून युपीआय पेमेंट करणं सोपं तसंच सुविधाजनक असल्याची माहिती एनपीसीआयने दिली आहे. तसंच 9.41 अब्ज ट्रान्झॅक्नशनमध्ये 14.89 लाख कोटी रुपयांचं हस्तांतरण करण्यात आलं आहे. तर एप्रिलमधील डेटानुसार 8.89 कोटींच्या व्यवहातात 14.07 लाख कोटी रुपये हस्तांतरी करण्यात आले आहेत.

PWC India ने दिलेल्या अहवालानुसार 2026-27 पर्यंत दिवसाला 1 अब्ज रुपयांची उलाढाल युपीआयमार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे रिटेल पेमेंट हे 90 टक्के होईल. तसंच 'द इंडियन पेमेंट्स हँडबुक - 2022-27' मध्ये एक अहवाल आहे, त्यानुसार 2022-23 या कालावधीत एकूण व्यवहारात 75 टक्के वाटा हा युपीआयचा असल्याचं सांगण्यात आलं आहे. भारतीय डिजिटल पेमेंटच्या सीएजीआरमध्ये 50 टक्क्यांची स्थिर वाढ दिसून आली आहे.

एका रिपोर्टरनुसार क्रेडिट कार्ड युपीआयसोबपत जोडल्या गेल्याने डेबिट कार्डपेक्षा क्रेडिट कार्डमार्फत व्यवहारत वाढ होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 2024-25 मध्ये क्रेडिट कार्डच्या मदतीने डेबिट कार्डपेक्षा जास्त व्यवहार होण्याची शक्यता सांगण्यात येत आहे. तसंच क्रेडिट कार्ड जारी केल्यानंतर पुढील पाच वर्षात सीएजीआर 21 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता असून डेबिट कार्डचा सीएजीआर 3 टक्क्यांवर स्थिर राहण्याची शक्यता असल्याचं सांगितलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in