'मदर डेअरी'कडून गुड न्यूज; दूध, तूप, पनीर स्वस्त

नुकत्याच झालेल्या जीएसटी कपातीचा फायदा सर्वसामान्यांना देण्याचा निर्णय मदर डेअरीने घेतला असून सर्वच प्रॉडक्टमध्ये दरकपात लागू केली आहे. मदर डेअरीने दुधाच्या किंमतीत प्रतिलिटर दोन रुपयांच्या कपातीची घोषणा केली आहे. दुधाच्या किंमतीच्या दरकपातीचा फायदा २२ सप्टेंबरपासून ग्राहकांना दिला जाईल.
'मदर डेअरी'कडून गुड न्यूज; दूध, तूप, पनीर स्वस्त
Published on: 

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या जीएसटी कपातीचा फायदा सर्वसामान्यांना देण्याचा निर्णय मदर डेअरीने घेतला असून सर्वच प्रॉडक्टमध्ये दरकपात लागू केली आहे. मदर डेअरीने दुधाच्या किंमतीत प्रतिलिटर दोन रुपयांच्या कपातीची घोषणा केली आहे. दुधाच्या किंमतीच्या दरकपातीचा फायदा २२ सप्टेंबरपासून ग्राहकांना दिला जाईल.

मदर डेअरीच्या १ लिटर यूएचटी दुधाची (टोन्ड-टेट्रा पॅक) किंमत ७७ वरून ७५ रुपयांवर आली आहे, तर ४५० मिली दुधाचा पॅक आता ३३ रुपयांऐवजी ३२ रुपयांना उपलब्ध होईल. सर्व फ्लेवर्सच्या मिल्कशेकच्या १८० मिली पॅकची किंमत ३० रुपयांवरून २८ रुपयांवर आली आहे. २०० ग्रॅम चीजचे पॅकेट आता ९५ ऐवजी ९२ रुपयांना मिळेल. तर ४00 ग्रॅम चीजचे पॅकेट आता १९० रुपयांऐवजी १७४ रुपयांना मिळेल. मलाई पनीरचा २०० ग्रॅम पॅक १०० रुपयांवरून ९७ रुपयांवर आला आहे. तुपाच्या १ लिटर कार्टन पॅकची किंमत ६७५ रुपयांवरून ६४५ रुपयांवर आली आहे. ५०० मिली तुपाचा पॅक ३३० रुपयांवर आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in