नाश्ता न दिल्याने अल्पवयीन मुलाकडून आईची हत्या

आईने नाश्ता दिला नाही म्हणून अल्पवयीन मुलाने आईची हत्या केली. त्यानंतर तो पोलीस ठाण्यात गेला आणि पोलिसांना केलेल्या कृत्याची कबुली दिली.
नाश्ता न दिल्याने अल्पवयीन मुलाकडून आईची हत्या

बंगळुरू : आईने नाश्ता दिला नाही म्हणून अल्पवयीन मुलाने आईची हत्या केली. त्यानंतर तो पोलीस ठाण्यात गेला आणि पोलिसांना केलेल्या कृत्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणात आता पुढील तपास सुरू आहे. कर्नाटक येथील मुलबागल या ठिकाणी ही घटना घडली आहे. शाळेत जाण्यासाठी मुलगा तयारी करत होता. त्यावेळी त्याने आईला नाश्ता देण्यास सांगितले. आईने नाश्ता दिला नाही. त्याचा राग या मुलाला अनावर झाला. त्यातून त्याने त्याच्या आईची हत्या केली. त्यानंतर पोलिसांना जाऊन सगळा प्रकार सांगितला. आईचा राग आल्याने तिच्या डोक्यात लोखंडी रॉड मारल्याचे त्याने सांगितले. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणावर झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला. या हत्येमागे फक्त राग होता की आणखीही काही कारण होते, हे तपासले जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in