गरीबाच्या मुला विरोधात अविश्वासाचा ठराव - निशिकांत दुबे

हा अविश्वास गरीबांना घरे देणाऱ्या गरीबाच्या मुलाविरोधात आहे
 गरीबाच्या मुला विरोधात अविश्वासाचा ठराव - निशिकांत दुबे

नवी दिल्ली: विरोधकांनी आणलेल्या सरकार विरोधात अविश्वासाच्या ठरावाला उत्तर देतांना भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी प्रामुख्याने कॉंग्रेस पक्षाला आपल्या टिकेचे लक्ष्य केले. ते म्हणाले गोरगरीबांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या गरीबाच्या मुला विरोधात हा अविश्वास आहे.

हा अविश्वास गरीबांना घरे देणाऱ्या गरीबाच्या मुलाविरोधात आहे. गरीबांना पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या, स्वच्छता गृहे देणाऱ्या, प्रत्येकाच्या घरी वीज पुरवठा करणाऱ्या गरीबाच्या मुलाच्या विरोधात हा अविश्वास आहे अशा शब्दात दुबे यांनी विरोधकांना लक्ष्य केले. दुबे राहुल विषयी बोलतांना म्हणाले राहुल पुन्हा संसदेत आल्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला. पण ते बाहेर गेलेच नव्हते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते उपस्थित होते. दुसरी महत्वाची बाब म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केलेले नाही. राहुल यांनी माफी मागण्यास साफ नकार दिला आहे. माफी मागायला आपण काही सावरकर नाही असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यांची तुलना सावरकरांशी कधीच होउ शकत नाही हे दुबे यांनी यावेळी अधोरेखित केले.

logo
marathi.freepressjournal.in