ओदिशाचे खासदार अपघातात किरकोळ जखमी

बिजू जनता दलाचे खासदार रमेशचंद्र माझी ओदिशातील नबरंगपूर जिल्ह्यात एका रस्ता अपघातात जखमी झाले.
File Photo
File Photo
Published on

भुवनेश्वर : बिजू जनता दलाचे खासदार रमेशचंद्र माझी ओदिशातील नबरंगपूर जिल्ह्यात एका रस्ता अपघातात जखमी झाले. नबरंगपूरचे खासदार माझी, त्यांचा ड्रायव्हर आणि पीएसओ यांच्यासह रायपूरहून उमरकोट येथे घरी परतत असताना दर्गागुडा येथे हा अपघात झाला. रविवारी पहाटे झालेल्या या अपघातात वाहनाचे नुकसान झाले. मात्र, त्यांना किरकोळ जखमा झाल्याचे खासदार माझी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in