खासदार उदयनराजेंनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट; केल्या 'या' मागण्या

आज राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली, यावेळी त्यांनी काही मागण्या करत तसे पत्रही दिले
खासदार उदयनराजेंनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट; केल्या 'या' मागण्या
@Chh_Udayanraje

आज राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अमित शहांकडे नवी दिल्लीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे, अशी मागणी केली आहे. तसेच, राष्ट्रपुरुषांच्या अवमान रोखण्यासाठी देशामध्ये एक कायदा आणावा, अशीदेखील मागणी त्यांनी यावेळी केली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

खासदार उदयनराजे ट्विटमध्ये म्हणाले आहे की, "छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचे कर्तृत्व अफाट आहे. त्यांचे चरित्र व कार्य संपूर्ण जगासमोर नेण्यासाठी तसेच नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी नवी दिल्लीमध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक' उभारावे, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे केली. तसेच, राष्ट्रपुरूषांचा अवमान रोखणारा कायदा देशात आणावा, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे शासनमान्य अधिकृत चरित्र प्रकाशित करावे, अशीही मागणी केली. तसेच, या भेटीत अमित शाह यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in