मध्य प्रदेशातील लाडक्या बहिणींना मिळणार १,२५० ऐवजी १,५०० रुपये

एकीकडे महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना दर महिन्याचे पैसे देताना राज्य सरकारची दमछाक होत असतानाच, आता मध्य प्रदेशमधील लाडक्या बहिणींना सरकारकडून रक्षाबंधनाची वाढीव भेट मिळणार आहे. पुढील महिन्यात रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींना १,२५० रुपयांऐवजी १,५०० रुपये मिळणार आहेत.
मध्य प्रदेशातील लाडक्या बहिणींना मिळणार १,२५० ऐवजी १,५०० रुपये
Published on

भोपाळ : एकीकडे महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना दर महिन्याचे पैसे देताना राज्य सरकारची दमछाक होत असतानाच, आता मध्य प्रदेशमधील लाडक्या बहिणींना सरकारकडून रक्षाबंधनाची वाढीव भेट मिळणार आहे. पुढील महिन्यात रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींना १,२५० रुपयांऐवजी १,५०० रुपये मिळणार आहेत. त्यानंतर दिवाळीपासून दर महिन्याला १,५०० रुपये लाडक्या बहिणींच्या मिळणार १,२५० ऐवजी १,५०० रुपये खात्यात जमा होणार आहेत, अशी घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केली.

महिलांसाठी २७ हजार कोटी रुपयांचे विशेष बजेट तयार करण्यात आले असून त्यापैकी १८,६९९ कोटी रुपये ‘लाडली बहना’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ठेवण्यात आले आहेत, असे मोहन यादव यांनी सांगितले. रक्षाबंधनाला २५० रुपये अधिकचे मिळाल्यानंतर लाडकी बहीण योजनेतील १.२७ कोटींहून अधिक महिला लाभार्थ्यांना दिवाळीनंतर दरमहा १,५०० रुपयांची मदत मिळणार असल्याचे मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले.

“लाडली बहना योजनेच्या लाभार्थ्यांसाठी रक्षाबंधनाच्या दिवशी २५० रुपये अधिक मिळणार आहेत. त्यानुसार ऑगस्ट महिन्यात महिलांच्या खात्यात १,२५० रुपयांऐवजी १,५०० रुपये जमा होतील. तसेच दिवाळीपासून या योजनेची रक्कम २५० रुपयांनी वाढवली जाईल. त्यानंतर, महिलांच्या खात्यात १,२५० रुपयांऐवजी १,५०० रुपये जमा होऊ लागतील. लाडली बहना योजनेच्या १.२७ कोटी लाभार्थ्यांना त्याचा लाभ दिला जाईल,” असे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना अद्याप जून महिन्याचा हप्ता देण्यात आलेला नाही. या पैशांच्या प्रतीक्षेत असलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे जमा होतील, असे महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी स्षष्ट केले आहे. मात्र, मध्य प्रदेशमध्ये गेमचेंजर ठरलेल्या आणि महाराष्ट्रातही तीच पुनरावृत्ती करण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही योजना मात्र शेवटच्या घटका मोजत असल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींना २,१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुतीला अद्याप पूर्ण करता आलेले नाही.

‘लाडली लक्ष्मी’ योजनेचाही ५१ लाख मुलींना लाभ

आतापर्यंत ‘लाडली लक्ष्मी’ योजनेंतर्गत एकूण ५१ लाख मुलींना लाभ मिळाला आहे. यासाठी त्यांना ६७२ कोटी रुपये वितरीत करण्यात आल्याचे मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले. तसेच वन हक्क कायद्यांतर्गत ९,००० हून अधिक आदिवासी कुटुंबांना जमिनीचे हक्क देण्यात आले आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यात येईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.

logo
marathi.freepressjournal.in