देशाच्या विकासात एमएसएमईचे मोठे योगदान, आठ वर्षांत बजेटमध्ये ६५० टक्क्यांची तरतूद

देशाच्या विकासात योगदान दिल्याबद्दल मी देशातील एमएसएमई क्षेत्राचे आभार मानतो
 देशाच्या विकासात एमएसएमईचे मोठे योगदान, आठ वर्षांत बजेटमध्ये ६५० टक्क्यांची तरतूद
Published on

एमएसएमईमुळे देशाच्या निर्यातीत वाढ झाली असून क्षेत्राचा विस्तार करण्यावर सरकार अभूतपूर्व भर देत आहे. या क्षेत्रात आज अनेक नवीन योजना सुरु झाल्या आहेत. या योजना एमएसएमई क्षेत्राची गुणवत्ता आणि प्रगतीशी संबंधित आहेत. एमएसएमई क्षेत्राला बळकटी देण्यासाठी गेल्या आठ वर्षांत आमच्या सरकारने बजेटमध्ये ६५० टक्क्यांहून अधिक वाढ केली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. देशाच्या विकासात योगदान दिल्याबद्दल मी देशातील एमएसएमई क्षेत्राचे आभार मानतो असे त्यांनी म्हटले आहे.

कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले की एमएसएमई म्हणजे आपल्या सरकारसाठी मॅक्झिमम सपोर्ट टू (जास्तीत जास्त सपोर्ट) एमएसएमई आहे. गेल्या वर्षांमध्ये देशातील एमएसएमई क्षेत्रातील उद्योगांना १४ हजार कोटी रुपये केवळ अनुदान म्हणून देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित उद्योजक भारत कार्यक्रमाला संबोधित करत होते.

logo
marathi.freepressjournal.in