खोबऱ्यासाठी प्रति क्विंटल ११,५८२ रुपये एमएसपी निश्चित

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक घडामोडी विषयक मंत्रिमंडळ समितीने २०२५ च्या हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान आधारभूत दराला (एमएसपी) मान्यता दिली आहे.
खोबऱ्यासाठी प्रति क्विंटल ११,५८२ रुपये एमएसपी निश्चित
Pixabay
Published on

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक घडामोडी विषयक मंत्रिमंडळ समितीने २०२५ च्या हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान आधारभूत दराला (एमएसपी) मान्यता दिली आहे. २०२५ च्या हंगामासाठी खोबऱ्याचा एमएसपी ₹ ११५८२ रुपये तर तर गोटा खोबऱ्याचा एमएसपी १२१०० प्रति क्विंटल निश्चित केला.

सरकारने मिलिंग खोबरे आणि गोटा खोबऱ्याचा एमएसपी विपणन हंगामातील २०१४ मधील ₹ ५२५० प्रति क्विंटल आणि ₹ ५५०० प्रति क्विंटल वरून विपणन हंगाम २०२५ मध्ये ₹ ११५८२ प्रति क्विंटल आणि ₹ १२१०० प्रति क्विंटल वर आणला आहे.

एमएसपीमधील दरवाढीमुळे नारळ उत्पादकांना चांगला मोबदला मिळवून देईलच त्याचबरोबर शेतकऱ्यांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नारळ उत्पादनांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी खोबरे उत्पादन वाढवायला प्रोत्साहन देईल.

नाफेड अर्थात भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ, आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ, मूल्य समर्थन योजने अंतर्गत खोबरे आणि सोललेल्या नारळाची खरेदी करणारी केंद्रीय नोडल एजन्सी म्हणून काम करेल.

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक घडामोडी विषयक मंत्रिमंडळ समितीने २०२५ च्या हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान आधारभूत दराला (एमएसपी) मान्यता दिली आहे. २०२५ च्या हंगामासाठी खोबऱ्याचा एमएसपी ₹ ११५८२ रुपये तर तर गोटा खोबऱ्याचा एमएसपी १२१०० प्रति क्विंटल निश्चित केला.

सरकारने मिलिंग खोबरे आणि गोटा खोबऱ्याचा एमएसपी विपणन हंगामातील २०१४ मधील ₹ ५२५० प्रति क्विंटल आणि ₹ ५५०० प्रति क्विंटल वरून विपणन हंगाम २०२५ मध्ये ₹ ११५८२प्रति क्विंटल आणि ₹ १२१०० प्रति क्विंटल वर आणला आहे.

एमएसपीमधील दरवाढीमुळे नारळ उत्पादकांना चांगला मोबदला मिळवून देईलच त्याचबरोबर शेतकऱ्यांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नारळ उत्पादनांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी खोबरे उत्पादन वाढवायला प्रोत्साहन देईल.

नाफेड अर्थात भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ, आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ, मूल्य समर्थन योजने अंतर्गत खोबरे आणि सोललेल्या नारळाची खरेदी करणारी केंद्रीय नोडल एजन्सी म्हणून काम करेल.

logo
marathi.freepressjournal.in