मोदी इकोसिस्टीमचा मुलामा - जयराम रमेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनखर यांना फोन करून संसदेच्या संकुलातील काही खासदारांच्या ‘घृणास्पद नाट्य’ बद्दल तीव्र वेदना व्यक्त
मोदी इकोसिस्टीमचा मुलामा - जयराम रमेश
PM

नवी दिल्ली : तथाकथित मिमिक्री नॉन इश्यूवर आता मोदी इकोसिस्टीमचा मुलामा चढवला जात आहे. मात्र, भाजप खासदाराने दोन घुसखोरांना लोकसभेत प्रवेश कसा दिला यावर मौन बाळगण्यात येत आहे.  तसेच निलंबनाबद्दलही मौन बळगले आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

तृणमूल काँग्रेस नेत्याने उपाध्यक्ष जगदीप धनखड यांची नक्कल केल्याच्या टीकेबद्दल विरोधी पक्षाने भाजपला प्रत्युत्तर दिले आणि म्हटले की हा मुद्दा उपस्थित करून खासदारांच्या अभूतपूर्व निलंबनापासून लक्ष विचलित करण्याचा ‘हताश प्रयत्न’ केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनखर यांना फोन करून संसदेच्या संकुलातील काही खासदारांच्या ‘घृणास्पद नाट्य’ बद्दल तीव्र वेदना व्यक्त केल्‍याचे  उपराष्ट्रपती कार्यालयाने सांगितल्यानंतर काँग्रेसचा ही टीका केली आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक्सवर व्यक्त केलेल्या टीकास्त्रात म्हटले आहे की, म्हैसूरच्या एका भाजप खासदाराने १३ डिसेंबरला लोकसभेत दोन घुसखोरांना का आणि कसे प्रवेश दिला या खऱ्‍या मुद्द्यावरून संपूर्ण मोदी इकोसिस्टम आता तथाकथित मिमिक्री नॉन इश्यूवर गप्प आहे. दहशतवादविरोधी कायदा यूएपीए अंतर्गत त्या घुसखोरांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. तर अगदी न्याय्य मागणी केल्याबद्दल १४२ खासदारांच्या निलंबनावर संपूर्ण इकोसिस्टमही शांत आहे.

logo
marathi.freepressjournal.in